मुंबई: रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्ससाठी चांगले फायदेशीर प्रीपेड प्लानची(prepaid plans) मोठी रेंज ऑफर करत आहे. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेली डेटासह अनेक इतर फायदेही मिळत आहेत. युजर्सबाबत बोलायचे झाल्यास त्यांनाही असे प्लान्स हवे असतात जे कमी किंमतीत जास्त डेली डेटासह फ्री कॉलिंगसारख्या सुविधा देतील. जाणून घ्या २५० रूपयांपेक्षाही कमी जिओचे टॉप ३ प्लान्स.
जिओचा हा प्लान २४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.. प्लानमध्ये कंपनी युझरला दिवसाला १ जीबी डेटा ऑफर करते. प्लानच्या सबस्क्रायबरला दररोज १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमाशिवाय दुसऱ्या जिओ अॅप्सचेही फ्री सबस्क्रिप्शन मिळते.
२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस दिले जात आहेत. इंटरनेट युजर्ससाठी या प्लानमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा म्हणजेच एकूण ४२ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानचे सबस्क्रायबर्सला जिओच्या अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळते.
या प्लानमध्ये कंपनी दररोज युजर्सला २ जीबी डेटा म्हणजेच एकूण मिळून ५६ जीबी डेटा ऑफर करते. २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. प्लानच्या सबस्क्रायबर्सला कंपनी जिओचे अॅप्स जसे जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेस दिला जातो.