सॅमसंगचा नवा फोल्डेबल स्मार्टफोन! जाणून घ्या फिचर आणि किंमत 

फोना-फोनी
Updated Jul 16, 2019 | 12:12 IST

Samsung Fold: सॅमसंगनं एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आपल्या खात्यात सादर केला आहे. ज्याचं डिझाईन पूर्णतः वेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं आहे. जाणून घेऊया कसा आहे हा स्मार्टफोन. तसंच त्याचे फिचर आणि किंमत.

Samsung (LetsGoDigital)
सॅमसंगचा नवा फोल्डेबल स्मार्टफोन! जाणून घ्या फिचर (LetsGoDigital)  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः सॅमसंगनं या वर्षीच्या सुरूवातीला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी कधी येत आहे याची लोकं वाट पाहात आहेत. या स्मार्टफोनची स्क्रीन क्रॅक होण्याची समस्या समोर आल्यानंतर कंपनीनं या फोनची विक्री पुढे ढकलली. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनची बुकींग सुरू झाली आहे. सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन पेक्षाही एक पाऊल पुढे टाकत नवी पद्धतीच्या फोनवर काम करत आहेत. 

सॅमसंगनं एक नवीन डमी सादर केलं आहे. त्याच्या अंतर्गत कंपनी फ्लेक्सिबल स्मार्टफोनवर काम करत आहेत. सॅमसंग रोलेबल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे अशी बातमी याआधी समोर आली होती. याचं एक उदाहरण तुम्ही हल्लीच आलेल्या आय एलजी रोलेबल टीव्हीमध्ये बघू शकता. एलजीनं हा टीव्ही एलजी सिग्नेचर ओलेड या नावानं लॉन्च केला. सॅमसंगच्या रोलेबल स्मार्टफोनमध्ये फोनची स्क्रीन दोन्ही बाजूनं ओढून वाढवता येऊ शकते. 

samsung

(फोटो साभारः LetsGoDigital) 

सॅमसंग स्मार्टफोनला टॅबलेटच्या साईजमध्ये बदलता येऊ शकतं. 

सॅमसंग डिस्प्लेद्वारे या स्मार्टफोनच्या डिझाईनचा डमी सादर केला आहे. ११ जूनला हे डमी डिस्प्ले डिव्हाईसचं नावावरून यूएसपीटीओ (युनायटेट स्टेट डमी अॅन्ड ट्रेड मार्क ऑफिस) डेटाबेस पब्लिश केलं आहे. डमीमध्ये २७ स्क्रेच देण्यात आले आहेत. ज्यात स्मार्टफोनचा डिस्प्ले खेचून वाढवता येऊ शकतो. 

खेचल्यावर स्मार्टफोनची साईज जवळपास तीन पटीनं वाढेल. दरम्यान स्मार्टफोनचं डिझाईन आताच्या डिझाईनहून खूप वेगळं आहे. यात तुम्हाला फोनच्या वर आणि खाली अशी दोन्ही बाजूला एक मोठं बेजल बघायला मिळू शकते. फोनच्या पेटेटंमध्ये कॅमेरा, रिसिव्हर आणि एक ड्रायव्हर माऊंट देखील दिसतो. ज्याच्या मदतीनं फोनची स्क्रिन वाढते आणि तिथेच एडजस्ट होते. स्मार्टफोनची स्क्रिन दोन्ही बाजूनं खेचून वाढवली जाऊ शकते. 

दरम्यान अशा प्रकारचा स्मार्टफोन वास्तविक रूपानं तयार करण्यासाठी कंपनीला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. स्मार्टफोन सारखा सारखा उघड आणि बंद केल्यानं खूप धूळ फोनच्या आत जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे फोनची रोलेबल प्रक्रिया प्रभावित होईल. दुसरी सर्वांत मोठी समस्या आहे ती, ही स्क्रिन फोनमध्ये स्टोर करण्याची. सध्याच्या स्मार्टफोन ट्रेंडमध्ये, आपण हे पाहू शकता की आवश्यक भागानंतर फोनमध्ये फक्त थोडासा जागी बाकी असते. अशात इतकी मोठी स्क्रिन कशी फिट होईल. डमीमध्ये स्मार्टफोनचा कॅमेरा, 3.5 एमएम जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर देखील येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
सॅमसंगचा नवा फोल्डेबल स्मार्टफोन! जाणून घ्या फिचर आणि किंमत  Description: Samsung Fold: सॅमसंगनं एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आपल्या खात्यात सादर केला आहे. ज्याचं डिझाईन पूर्णतः वेगळ्या पद्धतीनं करण्यात आलं आहे. जाणून घेऊया कसा आहे हा स्मार्टफोन. तसंच त्याचे फिचर आणि किंमत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...