५० मेगापिक्सेल कॅमेरा असलेले सॅमसंगचे २ मोबाईल बाजारात

Samsung Galaxy A13 and Samsung Galaxy A23 Launched In India : सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) आणि सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) हे दोन मोबाईल बाजारात दाखल झाले.

Samsung Galaxy A13 and Samsung Galaxy A23 Launched In India
५० मेगापिक्सेल कॅमेरा असलेले सॅमसंगचे २ मोबाईल बाजारात 
थोडं पण कामाचं
  • ५० मेगापिक्सेल कॅमेरा असलेले सॅमसंगचे २ मोबाईल बाजारात
  • पाच हजार एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा ही सॅमसंग गॅलक्सी ए १३ आणि सॅमसंग गॅलक्सी ए २३ची वैशिष्ट्ये
  • किंमतीची सुरुवात १४ हजार ९९९ रुपयांपासून पुढे

Samsung Galaxy A13 and Samsung Galaxy A23 Launched In India : सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) आणि सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) हे दोन मोबाईल बाजारात दाखल झाले. हे दोन्ही मोबाईल फोर जी आहेत. सॅमसंग गॅलक्सी ए १२ (Samsung Galaxy A12) आणि सॅमसंग गॅलक्सी ए २२ (Samsung Galaxy A22) या दोन्ही मोबाईलची ही अपग्रेड व्हर्जन आहेत. पाच हजार एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा ही सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) आणि सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) या दोन मोबाईलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. । मोबाईल आणि सर्व्हिस प्रोव्हायडर संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या (फोना-फोनी)

सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) 4GB रॅम + 64GB इनबिल्ट मेमरी हा फोन १४ हजार ९९९ रुपयांत तर सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) 6GB रॅम + 128GB इनबिल्ट मेमरी हा फोन १७ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. ब्लॅक, लाइट ब्ल्यू, ऑरेंज आणि व्हाइट या रंगांमध्ये सॅमसंग गॅलक्सी ए १३ उपलब्ध आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) 6GB रॅम + 128GB इनबिल्ट मेमरी हा फोन १४ हजार ९९९ रुपयांत तर सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) 8GB रॅम + 128GB इनबिल्ट मेमरी हा फोन २० हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. ब्लॅक, लाइट ब्ल्यू, ऑरेंज आणि व्हाइट या रंगांमध्ये सॅमसंग गॅलक्सी ए २३ उपलब्ध आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) आणि सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) हे दोन्ही मोबाईल ऑनलाईन खरेदीसाठी सॅमसंग मोबाईलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 

सॅमसंग गॅलक्सी ए १३ (Samsung Galaxy A13) या फोनमध्ये अँड्रॉइड १२ बेस्ड One UI 4.1, 6GB पर्यंतच्या रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर, ६.६ इंच फुल-HD+ (1,080x2,408 पिक्सेल) LCD डिस्प्ले, मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि पाच मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, दोन मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा, दोन मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा, आठ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, १२८ GB पर्यंत स्टोरेज, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि पाच हजार एमएएच बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलक्सी ए २३ (Samsung Galaxy A23) या फोनमध्ये अँड्रॉइड १२ बेस्ड One UI 4.1, 8GB पर्यंतच्या रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर, ६.६ इंच फुल-HD+ (1,080x2,408 पिक्सेल) LCD डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि पाच मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, दोन मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा, दोन मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा, आठ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, १२८ GB पर्यंत स्टोरेज, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि पाच हजार एमएएच बॅटरी आहे. सोबत 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी