सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन

फोना-फोनी
Updated May 28, 2019 | 14:42 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Samsung Galaxy A50 Price slashed: सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलक्सी A50 या स्मार्टफोनच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी कंपनीने गॅलक्सी A10, A20 आणि A30 या स्मार्टफोनच्या दरात कपात केली होती.

samsung galaxy a50 price slashed
Samsung Galaxy A50  

मुंबई: तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या दरात कपात केली आहे. कोरियन कंपनी सॅमसंने या वर्षाच्या सुरुवातीला सॅमसंग गॅलक्सी ए सीरिज रिलॉन्च करण्यात आली होती. या सीरिज अंतर्गत कंपनीने आतापर्यंत भारतीय बाजारात 5 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आता कंपनी या स्मार्टफोनच्या दरात कपात करत आहे. सॅमसंग कंपनीने आपल्या सॅमसंग गॅलक्सी A50 स्मार्टफोनच्या दरात 1500 रुपयांनी कपात केली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केलेला हा फोन 4GB रॅम 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम 64GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलक्सी ए50 स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलक्सी A50 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी यू डिस्प्ले आणि सॅमसंग सुपर एमोलेड रिझॉलुशनसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोअर Exynos 9610 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला तीन रियर क्रमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 25MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MPचा अल्ट्रा वाइड लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

फोनच्या पुढील बाजुला 25MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए50 फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी देणअयात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. फास्ट डेटा ट्रान्सफरसाठी फोनमध्ये तुम्हाला यूएसबी टाइप सी देण्यात आला आहे. यापूर्वी सॅमसंग कंपनीने गेल्या महिन्यात सॅमसंग गॅलक्सी 10, गॅलक्सी A20 आणि गॅलक्सी A30 या स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली होती. 

सॅमसंग गॅलक्सी A50 ची किंमत

सॅमसंग कंपनीने गॅलक्सी A50 फोनच्या किमतीत कपात केल्यानंतर 4Gb रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,490 रुपये झाली आहे. तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन नव्या किंमतीसह अॅमेझॉन, सॅमसंग इंडिया ची वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन Description: Samsung Galaxy A50 Price slashed: सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलक्सी A50 या स्मार्टफोनच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी कंपनीने गॅलक्सी A10, A20 आणि A30 या स्मार्टफोनच्या दरात कपात केली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola