मुंबई: सॅमसंगने यावर्षी आपला पहिला स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी M02s लाँच केला आहे. बजेट स्मार्टफोन असलेला हा मोबाइल M-moniker सीरीजचा आहे. 2019 मध्ये M10 आणि M20 डिव्हाइससह ही सीरीज सुरु झाली होती. एम-सीरीजचं अंडरलाइनिंग फॅक्टर सिंपल-इन-हाउस कंपोनेट्स होतं जे एक अल्ट्रा प्लास्टिक फ्रेम आणि एक प्राइस टॅगवर होतं. जसजशी सीरीज येत गेल्या तसतशी प्लास्टिकच्या फ्रेम चांगल्या होत गेल्या, कॅमरे आणि बॅटरी मोठी होत गेली आणि आयपीएस एलसीडीऐवजी डिस्प्ले AMOLED झाला आणि भारतीय स्मार्टफोन बाजारात किंमत देखील कमी झाली. आता, सॅमसंगने नवा M02s स्मार्टफोन लाँच केला आहे जो बेस 3/32GB व्हेरिएंटसाठी 8,999 रुपये आणि टॉप-स्पेक 4/64GB व्हेरिएंटसाठी 9,999 रुपये किंमतीसह सुरु होत आहे. जर आपल्याला देखील बजेट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा स्मार्टफोन आपल्यालाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
M10 आणि M20 रेंजपासून स्क्रॅच-प्रोन प्लास्टिक फ्रेमऐवजी याला पॉली कार्बोनेट पॅनलद्वारा पुन्हा बदलण्यात आलं आहे. पण यावेळी याला अनेक वेगळ्या गोष्टींसह मागील बाजूने एक चांगला जियोमेट्रिक पॅटर्न देण्यात आला आहे. सॅमसंगने डिस्प्ले थोडा कर्व्ह्ड केलं आहे. ज्यामुळे आपल्याला स्मूद-आउट फील मिळणार आहे. पण हा फोन वजनाला काहीसा जड असणार आहे. 5,000mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. यामध्ये एक 3.5 मिमी हेडफोन जॅक, बॅक पॅनलवर एक ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल, एक टाइप-सी यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ड्यूल मायक्रोफोन, एक टॉप आणि एक सर्वात खाली असणार आहे. हा फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
ट्रिपल कॅमेरा
यामध्ये फोनमध्ये रिअर ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल असणार आहे. जो आयताकार कॅमेरामध्ये मागे तीन सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश असणार आहे. कॅमेरा मॉड्यूल हा त्या लोकांना समान वाटेल ज्यांनी M31 किंवा M30s पाहिला असेल। यामध्ये एक सेंसर 13-मेगापिक्सल असेल. तर 2-मेगापिक्सलचा डेप्थ कंट्रोल सेंसर असणार आहे. तसेच यामध्ये 2-मेगापिक्सला मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. यामध्ये नॉच अपफ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये आयएसओ कंट्रोल, तापमान नियंत्रण, ऑटो फ्लॅश, डिजिटल झूम, एचडीआर आणि एक्सपोजरसह प्रो मोड यासारखे फीचर देखील देण्यात आलं आहे.