Samsung Galaxy M10 स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन

फोना-फोनी
Updated Jul 02, 2019 | 15:59 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Samsung M10: सॅमसंग कंपनीने आपल्या स्वस्त स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. गॅलक्सी एम सीरिजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी एम10 आता आणखीन कमी किमतीत मिळणार आहे. पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन

Samsung Galaxy M10
Samsung Galaxy M10 

मुंबई: सॅमसंग गॅलक्सी एम10 या स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत 1000 रुपयांची कपात केली आहे. ही कपात कमी आणि डिस्काऊंट असल्याचं दिसत आहे कारण ही नवी किंमत काही काळासाठीच असल्याची माहिती समोर येत आहे. नव्या किमतीमध्ये तुम्ही अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाईटवरुन हा फोन खरेदी करु शकता. सॅमसंग गॅलक्सी एम सीरिज स्मार्टफोनची विक्री 20 लाखांहून अधिक झाल्याने कंपनीने हा डिस्काऊंट दिला आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला सॅमसंग कंपनीने गॅलक्सी एम10 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. लॉन्च करताना या स्मार्टफोनची किंमत 7,990 रुपये ठेवण्यात आली होती. सॅमसंग इन्फिनिटी व्ही डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह हा फोन उपलब्ध आहे. 

सॅमसंग गॅलक्सी एम10 ची किंमत

सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून या डिस्काऊंटची माहिती दिली आहे. कंपनीने ट्विट करत सांगितले की, सॅमसंग गॅलक्सी एम10 या स्मार्टफोनच्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता 6,990 रुपये आहे तर 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट आता 7,990 रुपयांत उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम10 स्मार्टफोन जानेवारी महिन्यात 7,990 रुपये आणि 8,990 रुपये या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीतर्फे डिस्काऊंट देण्यात आला आहे. या डिस्काऊंटमुळे रिअलमी सी1 आणि नोकिया 2.2 या स्मार्टफोनला सॅमसंग टक्कर देणार आहे. शाओमी रेडमी 7A स्मार्टफोन सुद्धा लॉन्च होणार आहे ज्याची स्पार्धा सॅमसंगच्या स्मार्टफोन सोबत असणार आहे. शाओमी हा स्मार्टफोन 4 जुलै रोजी लॉन्च करण्याची शक्यता आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम10 चे फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉई़ड 8.1 ओरियो सिस्टम देण्यात आली आहे. नुकतचं या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड पाय अपडेट मिळण्यास सुरूवात झाली आहे. फोनमध्ये 6.2 इंचाचा एचडी प्लस इन्फिनिटी व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Exynos 7870 प्रोसेसर आणि 3GB पर्यंत रॅम, 32GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13MP प्रायमरी सेंसर आणि 5MP चा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजुला फोटो आणि व्हिडिओ चॅटिंगसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 16GB आणि 32 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोनमधील स्टोरेज क्षमता मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 512GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 3400 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Samsung Galaxy M10 स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन Description: Samsung M10: सॅमसंग कंपनीने आपल्या स्वस्त स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. गॅलक्सी एम सीरिजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी एम10 आता आणखीन कमी किमतीत मिळणार आहे. पाहा किती रुपयांनी स्वस्त झाला फोन
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola