सॅमसंगच्या भन्नाट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग, रेडमी नोट ८ प्रोशी असणार टक्कर

Samsung Galaxy M31: सॅमसंग गॅलेक्सी एम 31 हा आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. ज्याची थेट स्पर्धा रेडमी नोट 8 प्रो सोबत असणार आहे.

samsung galaxy m31 smartphone will compete with redmi note 8 pro know what is the special feature 
सॅमसंगच्या भन्नाट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग, रेडमी नोट ८ प्रोशी असणार टक्कर  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: सॅमसंग गॅलेक्सी एम 31 हा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात लाँच होणार आहे. कंपनी हा स्मार्टफोन २५ फेब्रुवारीला बाजारात आणणार आहे. गॅलेक्सी एम 30 च्या यशानंतर कंपनी हा नवा स्मार्टफोन लाँच आहे. या नव्या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात तब्बल 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. 

या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतं. या फोनमध्ये ग्रेडियंट बॅक फिनिश पाहायला मिळेल.

म्हणजेच, गॅलेक्सी एम सीरीजप्रमाणेच या नव्या फोनचा लूक असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 31 स्मार्टफोन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही की, सॅमसंग हा फोन लाँच करण्यासाठी एखादा इव्हेंट आयोजित करणार आहे की सोशल मीडियावरच याचं लाँचिंग केलं जाईल. 

Samsung Galaxy M31 specifications

सॅमसंगच्या साइटवर स्मार्टफोनच्या लाँच शेड्यूलपेक्षा  सॅमसंग गॅलेक्सी एम 31 चे फीचरच हायलाईट करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी प्लस सुपर एमोलेड इन्फिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे. वेबसाइटवर या फोनच्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअपची झलक दाखविण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा असेल. तसंच या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 31 स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन परवडणार्‍या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा ही रेडमी नोट 8 प्रो आणि रियलमी 5 प्रो यांच्यासोबत असणार आहे. 

हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर आधारित आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅमसह आपल्याला मिळू शकतो. या फोनमध्ये 4 जीबी रॅमचा पर्याय देखील दिला जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी