सॅमसंगने 'या' स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात, आता स्वस्तात खरेदी करा फोन

Samsung smartphone price cut: सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एम सीरिजमधील दोन स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने याच वर्षी लॉन्च केले आहेत. जाणून घ्या स्मार्टफोनची नवी किंमत

Samsung Smartphone
सॅमसंग स्मार्टफोन (प्रातिनिधीक फोटो) 

थोडं पण कामाचं

  • सॅमसंगने गॅलक्सी एम20 आणि गॅलक्सी एम30 स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात
  • नव्या किमतीत हे स्मार्टफोन्स तुम्ही अॅमेझॉन इंडिया, सॅमसंग ऑनलाइन स्टोअर्समधून खरेदी करु शकता
  • आयसीआयसीआय बॅंकेच्या ग्राहकांना मिळणार पाच टक्के अतिरिक्त डिस्काऊंट

मुंबई: स्मार्टफोनप्रेमींसाठी आणि नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, सॅमसंग कंपनीने आपल्या दोन नव्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात केली आहे. Samsung Galaxy M20 आणि Samsung Galaxy M30 या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने याचवर्षी लॉन्च केले होते. मात्र, आता कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात केली आहे.

फोनवर एक्सचेंज डिस्काऊंट सुद्धा

सॅमसंग Galaxy M20 आणि Galaxy M30 हे दोन्ही स्मार्टफोन्स नव्या किमतीत सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर आणि अॅमेझॉन इंडियावर ग्राहकांना मिळणार आहे. अॅमेझॉनचा फ्रीडम सेल संपल्यानंतर सॅमसंग कंपनीने हा स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ किमतीत कपात करण्यात आलेला नाहीये तर ग्राहकांना फोनवर एक्सचेंज डिस्काऊंट सुद्धा मिळत आहे.

याच वर्षी कंपनीने लॉन्च केले होते स्मार्टफोन्स

सॅमसंग कंपनीने गॅलक्सी एम20 (Samsung Galaxy M20) हा स्मार्टफोन याच वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी बाजारात लॉन्च केला होता. यासोबतच कंपनीने गॅलक्सी एम10 हा स्मार्टफोन सुद्धा लॉन्च केला होता. तर सॅमसंग गॅलक्सी एम30 हा स्मार्टफोन कंपनीने एका महिन्यानंतर लॉन्च केला होता. हे सर्व स्मार्टफोन्स सॅमसंग एक्सपीरियंस 9.5 यूएक्सवर काम करतात आणि हे अँड्रॉईड ओरियोवर आधारित आहे. मात्र, आता या स्मार्टफोन्सला अँड्रॉईड 9 पाई आधारित वन यूआयचं अपडेट मिळालं आहे. 

पाहा किती रुपयांनी झाली कपात

लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलक्सी एम30 (Samsung Galaxy M30) स्मार्टफोनचं 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेलं व्हेरिएंट 13,990 रुपयांत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीने 14,990 रुपयांत लॉन्च केला होता. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 16,990 रुपये इतकी झाली आहे. लॉन्चिंगवेळी याच स्मार्टफोनच्या व्हेरिएंटची किंमत 17,990 रुपये होती. 

सॅमसंग गॅलक्सी एम20 स्मार्टफोनचं 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 9,990 रुपये इतकी झाली आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,990 रुपये इतकी झाली आहे. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोन्सच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 10,990 रुपये आणि 12,990 रुपये इतकी होती.

5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट

अॅमेझॉन इंडियावर या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरवर एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सॅमसंग कंपनीने रिअलमी आणि शाओमी यांसारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपली एम सीरिज लॉन्च केली आहे.

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलक्सी एम20 आणि एम30 या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर सॅमसंग कंपनीने दिलेल्या या ऑफरचा फायदा नक्कीच तुम्ही घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...