वनप्लसचा मोठा निर्णय, कंपनी आणते आहे २०,००० रुपयांखालील स्मार्टफोन, हे असतील फीचर्स

वनप्लसला बजेट स्मार्टफोन बनवणे आणि वरच्या श्रेणीतील स्मार्टफोनच्या तुलनेत त्यांचे फीचर्स कमी करणे अवघड नाही. वनप्लस आधीपासूनच नॉर्ड एन २०० ५ जीला एका बजेट किंमतीत विकते आहे.

OnePlus Smartphone
वनप्लसचे बजेट स्मार्टफोन 

थोडं पण कामाचं

  • कंपनी लवकरच २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे मोबाईल (Budget Smartphone) आणणार
  • पुढील तिमाही किंवा २०२२च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान कंपनी हे स्मार्टफोन बाजारात आणण्याची शक्यता
  • कंपनी आपल्या नॉर्ड सेरिज स्मार्टफोनला बाजारात आणू शकते

नवी दिल्ली: वनप्लस (OnePlus) ही जगप्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी आता पॉकेट फ्रेंडली किंमतीच्या स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय बाजारपेठेसंदर्भात आपले धोरण बदलताना कंपनी लवकरच २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे मोबाईल (Budget Smartphone) आणणार आहे. कंपनी आपल्या धोरणात बदल करत आहे आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोचण्याचा प्रयत्न करतेआहे. नव्या प्लॅनिंगनुसार वनप्लस हा ब्रॅंड आता भारतीय बाजारपेठेत २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. एरवी वनप्लस या ब्रॅंडचे स्मार्टफोन हे अतिशय महागडे असतात. (OnePlus to launch budget smartphones in India prices under Rs 20,000)

पहिल्यांदा बजेट स्मार्टफोनमध्ये आले अपयश

वनप्लस कधीपर्यत २०,००० रुपयांखालील स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणणार याची तारीख मात्र कंपनीने जाहीर केलेली नाही. अर्थात पुढील तिमाही किंवा २०२२च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान कंपनी हे स्मार्टफोन बाजारात आणेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. वनप्लसने २०१५ मध्ये वनप्लस एक्ससोबत पहिल्यांदा एक बजेट स्मार्टफोन बाजारात आणला होता. या स्मार्टफोनची तेव्हा भारतातील किंमत १६,९९९ रुपये होती. या स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर्स देण्याची घोषणा कंपनीने केली होती. मात्र या सेगमेंटमध्ये पाय रोवण्यात कंपनीला अपयश आले. त्यानंतर वनप्लसने या सेरीजमधून माघार घेतली होती आणि फक्त प्रिमियम स्मार्टफोनवरच लक्ष केंद्रित केले होते.

कंपनी आणते आहे नॉर्ड सेरिजचे स्मार्टफोन

जर वनप्लसने पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित केले तर कंपनी आपल्या नॉर्ड सेरिज स्मार्टफोनला बाजारात आणू शकते. सध्या वनप्लस नॉर्ड फोन बाजारात वनप्लसचे सर्वाधिक बजेट फोन आहेत. कंपनी एकेका श्रेणीत विक्री वाढवत बाजारात विस्तार करते आहे. वनप्लस नॉर्ड, नॉर्ड २ आणि नॉर्ड सीई ५जी सह वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्यात आले आहेत.

लवकरच बजेट स्मार्टफोनची सेरीज

त्यामुळेच वनप्लसला बजेट स्मार्टफोन बनवणे आणि वरच्या श्रेणीतील स्मार्टफोनच्या तुलनेत त्यांचे फीचर्स कमी करणे अवघड नाही. वनप्लस आधीपासूनच नॉर्ड एन २०० ५ जीला एका बजेट किंमतीत विकते आहे. मात्र हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. अमेरिकेत या स्मार्टफोनच्या विक्रीची कामगिरी लक्षात घेऊन कंपनी लवकरच याचप्रकारचे स्मार्टफोन भारतात लॉंच करू शकते.

भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ झपाट्याने विस्तारते आहे. या बाजारपेठेत बजेट स्मार्टफोनचा मोठा ग्राहकवर्ग आहे. आगामी काळात देशातील मोठी लोकसंख्या स्मार्टफोनचा वापर करू शकते. या नव्या ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक कंपन्यानी कंबर कसली आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आगामी काळात अनेक नव्या आणि तेही तुमच्या बजेटमधील स्मार्टफोनची रेलचेल दिसणार आहे. वनप्लससारख्या प्रिमियम स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांदेखील या बाजारपेठेची ताकद आणि त्यातील नफा लक्षात आला आहे. त्यामुळेच वनप्लस लवकरच भारतीय बाजारपेठेत बजेट स्मार्टफोन आणून या श्रेणीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी