Smartphone Price : स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी दु:खाची बातमी,आत्ताच करा Smartphones घेण्याचा विचार नाहीतर निघेल दिवाळं

फोना-फोनी
भरत जाधव
Updated Oct 23, 2022 | 13:29 IST

Smartphone Price Hike in India: ET Telecom ताज्या अहवालानुसार येत्या महिनाभरात स्मार्टफोनच्या किमतीत पाच ते सात टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच 17 हजार रुपयांच्या स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत 20 हजार रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. अहवालात असेही म्हटले आहे की,  ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान या वाढलेल्या किंमतींचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे. 

Buying smartphones will be out of your budget
Smartphones घेणं होईल तुमच्या बजेटच्या बाहेर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतात डॉलरच्या वाढत्या मूल्यामुळे कंपन्या लवकरच त्यांच्या उत्पादनांची आणि उपकरणांची किंमत वाढवू शकतात.
  • नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात.
  • येत्या महिनाभरात स्मार्टफोनच्या किमतीत पाच ते सात टक्क्यांची वाढ होऊ शकते.

नवी दिल्ली :  सध्या दिवाळी (Diwali) सण मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. या दिवाळीच्या हंगामात अनेकजण नवीन वस्तू आपल्या घरी आणत असतात. (Mobile)मोबाईलपासून ते मोठ्या चारचाकी वाहनांपर्यंतच्या वस्तू अनेकांच्या घरात येत असतात. विशेष म्हणजे दिवाळीमध्ये स्मार्टफोन्सला (Smartphones)मोठी बाजारपेठ (Market)मिळत असते.  दिवाळी हंगामात अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी करुन त्याची विक्री करतात . विशेषत:  मोबाईल फोनच्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सुट देत आपली उत्पादने या दिवसात विकत असतात. तुम्हीही स्मार्टफोन्सचे शौकीन असाल तर फोन घेण्याचा आत्ताच प्लान करा. नाहीतर दिवाळीनंतर फोन घेताना तुम्हाला खिसा जास्त खाली करावा लागेल. (Sad news for smartphone buyers, do want buying Smartphones then plan now or you will have to pay more)

अधिक वाचा  : 2030 पर्यंत वाढतील लठ्ठपणा अन् हृदयविकाराचे नवीन प्रकरणं
प्रत्येकजण काही वर्षे फोन वापरल्यानंतर फोन बदलण्याचा विचार करत असतो. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. दिवाळी 2022 नंतर तुमच्यासाठी स्मार्टफोन खरेदी करणे कठीण होऊ शकते कारण त्यानंतर फोनच्या किमतीत वाढ होऊ शकते.  परंतु आत्ताच्या दिवसात मोबाईलशिवाय जीवन जगणं हे अवघड आहे, त्यात मोबाईल स्मार्टफोन्सची किंमत वाढण्याची शक्यता असल्याने अनेकांना टेन्शन आले असेल.  दरम्यान, आज आपण जाणून घेणार आहोत की, या स्मार्टफोन्सची किंमत कशामुळे वाढत आहे. 

दिवाळी 2022 नंतर भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात

देशात सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे, या काळात अनेक कंपन्या आपले मोबाईल फोन कमी किंमतीत विकत आहेत. परंतु दिवाळीनंतर ही परिस्थिती बदलू शकते. सध्या ज्या किंमतीमध्ये स्मार्टफोन मिळत आहे त्याच किंमतीमध्ये फोन मिळेल याची शक्यता कमीच आहे. दिवाळीच्या सीझननंतर, पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात. यामागेही एक मोठे कारण आहे. याचं कारण डॉलरमुळे स्मार्टफोनने आपला भाव वाढवला आहे.  अर्थमंत्री  निर्मला सितारमन यांनी सहज बोलून दिलं की, रुपया कमजोर झाला नाहीतर डॉलर मजबूत झाला. पण डॉलरचं मजुबत होणं सामन्य माणसाला मोबाईल घेणं परवडणारं नाहीये.  

अधिक वाचा  : या बँकेत नोकरी भरती आहे खास; पदं भरली जातील 60

स्मार्टफोनची किंमत किती वाढणार?

ET Telecom ताज्या अहवालानुसार येत्या महिनाभरात स्मार्टफोनच्या किमतीत पाच ते सात टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच 17 हजार रुपयांच्या स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत 20 हजार रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. अहवालात असेही म्हटले आहे की,  ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान या वाढलेल्या किंमतींचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे. 

स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची कारणे

भारतात डॉलरच्या वाढत्या मूल्यामुळे कंपन्या लवकरच त्यांच्या उत्पादनांची आणि उपकरणांची किंमत वाढवू शकतात. वाढत्या चलनामुळे ब्रँड्सना आयात केलेल्या घटकांसाठी जास्त किंमत मोजावी लागणार असून याचा परिणाम कंपनीच्या वापरकर्त्यांवरही होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी