फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा Smartphone, 200MP कॅमेरा आणि चक्रावून टाकणारी किंमत

Smartphone that fully charges in just 10 minutes, 200MP camera and a staggering price : रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशन  (Redmi Note 12 Discovery Edition) चीनमध्ये गुरुवारी लाँच केली.

Smartphone that fully charges in just 10 minutes, 200MP camera and a staggering price
फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा Smartphone, 200MP कॅमेरा आणि चक्रावून टाकणारी किंमत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा Smartphone
  • 200MP कॅमेरा आणि चक्रावून टाकणारी किंमत
  • अनोखी वैशिष्ट्ये

Smartphone that fully charges in just 10 minutes, 200MP camera and a staggering price : रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशन  (Redmi Note 12 Discovery Edition) चीनमध्ये गुरुवारी लाँच केली. शाओमीच्या सब ब्रँड रेडमीने 'रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशन' लाँच केली. या एडिशनमध्ये कंपनीने रेडमी नोट 12, रेडमी नोट 12 प्रो, रेडमी नोट 12 प्रो प्लस हे मोबाईल लाँच केले. डिस्कव्हरी एडिशनमधील सर्व मोबाईल रेडमी प्रो प्लस मोबाईलच्या मॉडेल सारखे आहेत. नव्या एडिशनध्ये 210W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच डिस्कव्हरी एडिशनच्या मोबाईलमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. डिस्कव्हरी एडिशनच्या मोबाईलमध्ये 210W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टद्वारे 10 मिनिटांत 4300mAh बॅटरी चार्ज होते.

रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशनची किंमत

रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशनमधील 8GB + 256GB व्हेरिएंटच्या मोबाईलची किंमत चीनमध्ये 2399 CNY म्हणजेच 27 हजार 200 रुपये आहे. या मोबाईलची विक्री चीनमध्ये गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. लवकरच  रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशनचे मोबाईल जगभर लाँच होणार आहेत. पण ग्लोबल लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 

रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशनची वैशिष्ट्ये

रेडमी नोट 12 डिस्कव्हरी एडिशनचे मोबाईल ड्युअल सिमचे आहेत. हे स्मार्टफोन अँड्रॉईड 12 बेस्ड MIUI 13 वर चालतील. 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67-इंच फुल-HD+ (1,080x2,400 पिक्सेल), OLED डिस्प्ले पण या मोबाईलमध्ये दिला आहे. यात 8GB LPDDR4X रॅम आणि Mali-G68 GPU सह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर आहे. 

मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले...पाहा नेमके काय झाले

पोलीस महाभरतीची जाहिरात निघाली, जाणून घ्या अर्ज करण्याची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील

फोटोग्राफीसाठी 200MP प्रायमरी रेअर कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे. 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा पण मोबाईलमध्ये दिला आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा पण दिला आहे. तसेच मोबाईलमध्ये 5G, Wi-Fi 6, ब्ल्यूटूथ v5.2 कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी