Smarthpone खरेदी करताय? मग हे आहेत 20 हजारांहून कमी किमतीचे जबरदस्त फोन

Smarthpone under Rs 20000: तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन सांगत आहोत ते एकदा पहाच. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • 20 हजारांहून कमी किमतीचे स्मार्टफोन्स
  • स्वस्तात मिळतील दमदार फीचर्स 

cheapest smartphones: सध्याच्या काळात जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन पहायला मिळतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपन्यांकडून दर महिन्याला बाजारात नवनवे स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च करण्यात येत आहेत. तुम्हाला सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे पण कन्फ्यूज आहात? तर मग आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबाबत सांगणार आहोत जे 20 हजारांहून कमी किमतीचे आहेत. ज्यामध्ये मोटो, वनप्लस, रेडमी, iQOO सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. (smartphones under rs 20000 check price features and specifications)

हा स्मार्टफोन Amazon वरुन 19,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 695 प्रोसेसर, 64MP प्रायमरी कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे.

Realme 9 5G SE

हा स्मार्टफोन क्रोमावरुन 19,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 48MP प्रायमरी कॅमेरा, Snapdragon 778G प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अधिक वाचा : Laptop Battery Tips : तुमच्या लॅपटॉपची बॅटरी डाउन होते का? बॅटरीचे आयुष्य लगेच वाढवण्यासाठीच्या 5 टिप्स...

iQoo Z6 5G

हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटलवरुन 14,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आलं आहे.

Moto G52

हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटलवर 14,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 11S

हा स्मार्टफोन Amazon वरुन 15,499 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा, 90Hz FHD+ डिस्प्ले, MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी