एअरटेल १५९९ रुपयांचा जबरदस्त प्लॅन, जिओला देणार टक्कर? 

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Jan 13, 2021 | 17:26 IST

Airtel 1599 Rs Postpaid Plan: एअरटेलने १५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. यातून केवळ ग्राहकांनाच खास सुविधा दिली जात नाही तर प्रतिस्पर्ध्यांना कंपन्यांना देखील नामोहरम करण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे.

strong competition for jio airtel launch rs 1599 postpaid plan
एअरटेल १५९९ रुपयांचा जबरदस्त प्लॅन, जिओला देणार टक्कर?   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वे वेगवेगळे प्लॅन्स बाजारात आणत आहेत, प्री-प्लॅन की पोस्ट-पेड प्लॅन असो, आकर्षक ऑफर्स असण्यासोबत परस्परांच्या ग्राहक बेसमध्ये प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न करीत आहेत. आता या दिशेने एअरटेलने १५९९ रुपयांच्या जबरदस्त पोस्टपेड प्लॅनच्या माध्यमातून मार्केटमध्ये पुन्हा एकदा जोरदार प्रवेश केला आहे. 

जिओ पोस्टपेड प्लस प्लॅनशी स्पर्धा करण्यासाठी एअरटेल आपल्या यूजर्संना ३९९ रुपयांपासून ते १५९९ रुपयांपर्यंतचे पोस्टपेड प्लॅनही देत आहे. भारती एअरटेलची १५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा प्रीमियम पोस्टपेड प्लॅनपैकी एक आहे. यामध्ये अमर्यादित डेटाचा लाभ (दरमहा 500GB) मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनवर 10% सवलत आणि इतरही फायदे आहेत. पण एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅन जसे की ७४९ आणि ९९९ रुपये हे या प्लॅनचा भाग नाही.

१५९९ रुपयाच्या पोस्टपेड प्लॅनची खास सुविधा

  1. एअरटेलच्या १५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग
  2. दररोज १०० एसएमएससह आणि २०० जीबी पर्यंत रोलओव्हरसह ५०० जीबी मासिक डेटा आणि इतर फायदे.
  3.  ५०० जीबी संपल्यानंतर यूजर्सकडून 2 पैसे / एमबी आकारले जातील.
  4. याशिवाय बेसिक फायद्यांव्यतिरिक्त, यूजर्संना दरमहा 200 आयएसडी मिनिटे तसेच सर्व आंतरराष्ट्रीय रोमिंग योजनांवर 10% सूट मिळते.

या प्लॅनमध्ये काय नाही

१५९९ रुपयांच्या या पोस्टपेड प्लॅनचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की नेटफ्लिक्स, डिस्ने+हॉटस्टार व्हीआयपी याची सबस्क्रिप्शन मिळत नाही. जर आपल्या क्षेत्रात 4जी कव्हरेज अधिक चांगली असेल आणि आपण अधिक डेटा वापरत असाल तर ही योजना आपल्यासाठी चांगली ठरु शकते.

एअरटेल इंटरनेशनल रोमिंग पोस्टपेड प्लॅनची ​​किंमत ४९९ रुपयांपासून सुरू होते. कंपनी एक वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, हँडसेट प्रोटेक्शन, शॉ अकॅडमी लाइफटाइम एक्सेस, एअरटेल एक्सट्रीम अॅप प्रीमियम मेंबरशिप, विंक म्युझिक मेंबरशिपसह वर्षभर अनलिमिटेड गाणी डाउनलोड तसेच Juggernaut बुक मेंबरशिप ऑफर करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी