Kiss करताच 'हा' फोन घेईल तुमचा फोटो, पाहा काय आहे हे नवे फिचर

फोना-फोनी
Updated Apr 19, 2019 | 18:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Google Pixel 3: स्मार्टफोनने कॅमेरा सामान्यांच्या हातात आणला. आता या कॅमेऱ्याला आणखी आकर्षक करण्याचं काम स्मार्टफोन कंपन्या करत आहेत. त्यात गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने कॅमेरा आकर्षक केलाय.

Google pixel 3 camera kiss feature
कॅमेरा घेईल, किस करतानाचा फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • गुगल पिक्सल 3 चे अनोखे फोटो फिचर
  • किस करतानाचा फोटो घेणार कॅमेरा
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सची किमया

नवी दिल्ली: कोणत्याही स्मार्टफोनमध्ये त्यातला कॅमेरा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आयुष्यातील काही सुंदर आणि मोलाचे क्षण कैद करण्यासाठी आपल्या फोनमधला कॅमेरा अतिशय उत्तम असेल याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याला आणखीनच आकर्षक बनवलयं. एआय फिचरचे हे कॅमेरे इतर कॅमेऱ्यांमधील फोटोंपेक्षा आणखी चांगले फोटो घेत आहेत. फोटोचा दर्जा वाढला असताना गुगल आता या फिचरला आणखी वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे.

Google Pixel 3 या फोनमध्ये कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने कॅमेरा फिचर आणखी उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहे. गुगलने पिक्सल फोनमध्ये नवीन कॅमेरा जोडला आहे. फोटोबुथ मोड, असे त्याचे नाव आहे. पिक्सल 3 मधल्या फोटोबूथ मोडच्या साह्यानं यूजर्स कपल सेल्फी आणि ग्रुप सेल्फी आणखी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. यासंदर्भात गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, पिक्सल 3 मध्ये फोटोबूथ मोड एक उत्तम कॅमेरा फिचर आहे. एकदा तुम्ही फोटोबूथ मोडमध्ये प्रवेश केल्यानंतर शटर बटनवर क्लिक केल्यास, फोन आपोआप चांगले फोटो क्लिक करायला सुरुवात करेल. यातील कॅमेरा खऱ्या अर्थाने स्मार्ट आहे. ज्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे ती व्यक्ती केव्हा अतिशय उत्तम एक्स्प्रेशन देते, कधी त्याचे डोळे नीट उघडे आहेत, याचे कॅमेरा निरीक्षण करतो. हे जबरदस्त फिचर एवढ्यावरच थांबत नाही.

किस डिटेक्शन फिचर

गुगलने फोटोबूथ मोडमध्ये किस डिटेक्शन फीचर जोडले आहे. गुगलने म्हटले आहे की, किस हा एक खूप प्रेमाचा क्षण असतो. फिचरला असे काही प्रोग्राम केले आहे की, कॅमेरा तो क्षण ऑटोमॅटिक कॅप्चर करेल. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गुगल काही बड्या फोटोग्राफर्ससोबत काम करत आहे. ज्यांच्याकडून एक्सप्रेशनची ओळख करून घेण्यासंदर्भात काम करण्यात येत आहे. त्यात यश मिळाल्यास कॅमेरा किसला आणखी चांगल्या पद्धतीने ओळखू शकेल.

असे वापरता येईल फिचर

सध्याच्या फिचरमध्ये स्माईल, जीभ बाहेर काढणे, डक फेस, फुगवलेले गाल आणि आश्चर्य व्यक्त करतानाचे भाव समाविष्ट करण्यात आले आहेत. सध्याच्या पिक्सल 3 मधील कॅमेऱ्यामध्ये फोटोबूथ मोडचा वापर केला तर, तुम्हाला आणखी चांगले फोटो आणि विशेषतः सेल्फी काढता येतील. जर, तुम्हाला हे फिचर वापरायचे असल्यास गूगल कॅमेरा 6.2 एबीके फाइल डाउनलोड करून घेऊ शकता आणि फोटोबुथ मोडचा वापर करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Kiss करताच 'हा' फोन घेईल तुमचा फोटो, पाहा काय आहे हे नवे फिचर Description: Google Pixel 3: स्मार्टफोनने कॅमेरा सामान्यांच्या हातात आणला. आता या कॅमेऱ्याला आणखी आकर्षक करण्याचं काम स्मार्टफोन कंपन्या करत आहेत. त्यात गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने कॅमेरा आकर्षक केलाय.
Loading...
Loading...
Loading...