मोबाइलवर बोलणे महागणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण...

फोना-फोनी
Updated Aug 01, 2020 | 13:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने म्हटले आहे की, दूरसंचार सेवांच्या दरात वाढ होणे निश्चित आहे. फक्त ती वाढ केव्हा होणार हा प्रश्न आहे.

elecom tariffs likely to increase
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: pixabay) 

थोडं पण कामाचं

  • एअरटेलने सांगितले, दूरसंचार सेवांच्या दरात वाढ होणे नक्की आहे
  • एअरटेलने सांगितले की 5G स्पेक्ट्रमसाठी सांकेतिक आरक्षित मूल्य खूपच जास्त आहे
  • 100 मेगाहर्ट्झसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमचे मूल्य कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक मॉडेलसाठी काम करण्याच्या पलीकडे

नवी दिल्ली: भारतातील टेलिकॉम सेवा (Telecom services) पुरवणाऱ्या भारती एअरटेलने (Bharti Airtel) गुरुवारी म्हटले की, दूरसंचार सेवांच्या दरात (Telecom services tariffs) वाढ होणे निश्चित आहे. फक्त ती वाढ केव्हा होणार हा प्रश्न आहे. कंपनीने सांगितले की टिकाऊ व्यवसायासाठी प्रति ग्राहक सरासरी मासिक महसूल (एआरपीयू) (RPU) आता वाढवून 200 रुपये आणि नंतर 300 रुपये करण्याची आवश्यकता आहे. एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) (CEO) गोपाल विट्टल (Gopal Vittal) यांनी पहिल्या त्रैमासिकातील (trimester) निकालांनंतर शेअर होल्डर्सना (shareholders) संबोधित करताना म्हटले की 5G स्पेक्ट्रमसाठी (5G spectrum) सांकेतिक राखीव किंमत ही खूपच जास्त आहे, परवडण्यायोग्य नाहीये आणि त्या स्तरावर व्यवसाय चालवण्याजोगे नाही. त्यांनी सांगितले की 5G अजूनही प्राथमिक स्तरावर आहे आणि हे प्रत्यक्षात येण्यासाठी अजून अनेक वर्षे लागतील.

विट्टल यांनी सांगितले की 5Gवरील मूलभूत समस्या म्हणजे 100 मेगाहर्ट्झसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमचे मूल्य हे कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक मॉडेलसाठी काम करण्याच्या पलीकडे आहे. स्पेक्ट्रमची किंमत कमी करणे आवश्यक आहे आणि आणि यासाठी गरजेचे असलेले तंत्रज्ञानही विकसित करणेही आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की डिव्हाईजच्या किंमती अजूनही 5Gसाठी जास्त आहे आणि काळानुसार या किंमती कमी होतील, पण सध्या या किंमती वेगाने खाली येताना दिसत नाहीत. कंपनीने सांगितले आहे की ते प्रयोगशाळेत 5G सोल्यूशन निर्माण करतील आणि इतर भागीदारांसह नवे उपाय शोधण्याच्या दिशेने काम करतील.

चीनी उपकरणे आणि विक्रेत्यांबद्दल विट्टल म्हणाले की, एअरटेल कंपनी अनेक कंपन्यांसोबत काम करते, ज्यात चीनी आणि युरोपीय भागीदारांचा समावेश आहे. हे करताना कंपनी ‘योग्य वाणिज्यिक मॉडेल’ आणि ‘आर्थिक रचना’ इत्यादी गोष्टी लक्षात घेते. त्यांनी सांगितले की जर सरकारकडून याबद्दल एखादा आदेश देण्यात आला तर आम्ही देशाच्या कायद्याचे पालन करू.

भारती एअरटेलने बुधवारी जूनच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून 15,933 कोटी रुपये झाला आहे. या सलग पाचव्या तिमाहीत कंपनी तोट्यात राहिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी