Poco X4 Pro 5G Launched in India : नवी दिल्ली : सध्या नव-नवीन स्मार्टफोनची मोठी चलती आहे. जर तुम्हीही स्मार्टफोनचे प्रेमी असाल आणि मोबाईल द्वारे फोटो काढण्याचे चाहते असाल तर तुमच्यासाठी Poco चा नवा मोबाईल बाजारात आला आहे. भारतीय Poco X4 Pro 5G या मोबाईल अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, दरम्यान देशातील ग्राहकांसाठी प्रतीक्षा संपली आहे. अधिकृतपणे कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Poco X3 Pro 5G ची सुधारित आवृत्ती आहे.
नव्या मोबाईलमध्ये तुम्ही बॅटरी आणि उत्तम प्रतीच्या कॅमेऱ्याचा शोध घेत असतात. तुमचा सर्वांचा हा शोध येथे संपणार आहे. कारण या नव्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना पॉवर बॅकअपसाठी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. याशिवाय हा स्मार्टफोन ग्लॉसी बॉडी आणि तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. त्याची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया..
भारतीय बाजारपेठेत Poco X4 Pro 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या 6GB + 64GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांना आणि 8GB + 128GB मॉडेल 21,999 रुपयांना बाजारात लॉन्च करण्यात आहे. हा स्मार्टफोन लेझर ब्लॅक (Laser Black), लेझर ब्लू (Laser Blue) आणि पोको यलो (Poco Yellow) कलर व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. परंतु हा स्मार्टफोन घेण्यासाठी तुम्हाला 5 एप्रिलची वाट पाहावी लागणार असून फ्लिपकार्टवरून (Flipkart) या मोबाईलची खरेदी करता येणार आहे.
Read Also : आंतराराष्ट्रीय बाजार भारतीय शेतमालाची वाढली मागणी
कोणीही पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, Poco X4 Pro 5G मोबाईल घेताना तुमचा पैसाही वाचणार आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC Bank Card वापरल्यास 1,000 रुपयांचा इंस्टन्ट डिस्काउन्ट मिळू शकणार आहे. तुम्ही Poco X2, Poco X3 आणि Poco X3 Pro स्मार्टफोन वापरत असल्यास आणि Poco X4 Pro 5G वर अपग्रेड करायचे असल्यास तुम्हाला 3,000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काउंट देखील मिळणार आहे.
Read Also : आर्मीमध्ये कुक अन् न्हावीसाठी भरती, जाणून घ्या पगार
Poco X4 Pro 5G स्मार्टफोन Android 11 OS वर आधारित आहे आणि यात ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,080×2,400 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP Samsung ISOCELL GW3 प्राथमिक सेन्सर आहे. तर 8MP अल्ट्रा वाइड शूटर आणि 2MP मॅक्रो शूटर देण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सुविधेसाठी यूजर्संना यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनच्या ग्लोबल वेरिएंटमध्ये 108MP चे प्राइमरी सेन्सर देण्यात आले आहे.