अॅपलचे CEO टीम कूक यांचा पगार ऐकलात तर व्हाल हैराण, 2018मध्ये मिळाला होता इतका बोनस

जगभरात सर्वांत जास्त पगार घेणाऱ्यांच्या यादीत दिग्गज कंपनी अॅपलचे टीम कूक यांचा समावेश होतो. स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर कूक 2011 मध्ये अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले.

Tim Cook
अॅपलचे CEO टीम कूक यांचा पगार ऐकलात तर व्हाल हैराण 

थोडं पण कामाचं

  • जगभरात सर्वांत जास्त पगार घेणाऱ्यांच्या यादीत दिग्गज कंपनी अॅपलचे टीम कूक यांचा समावेश होतो.
  • स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर कूक 2011 मध्ये अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले
  • त्यांच्या नेतृत्त्वात कंपनीनं चांगलं प्रदर्शन केलं.

Tim Cook Net Worth: जगभरात सर्वांत जास्त पगार घेणाऱ्यांच्या यादीत दिग्गज कंपनी अॅपलचे टीम कूक यांचा समावेश होतो. 1 नोव्हेंबरला आपला 59 वा वाढदिवस साजरा करणारे टीम कूक यांच्याबद्दल म्हटलं जातं की, एकवेळ त्यांची अशी परिस्थिती होती की ते घर चालवण्यासाठी वृत्तपत्र विकायचे. इंजिनिअर बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या कूक यांनी 1998 मध्ये अॅप्पल कंपनीत ज्वॉईन करण्याच्या आधी बऱ्याच कंपन्यांमध्ये नोकरी केली. 

स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर कूक 2011 मध्ये अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले. याआधी ते कंपनीचे सेल्स आणि मॅनेजमेंट विभागाचे वाइस प्रसीडेंट होते. टीम कूक यांच्या पगाराबद्दल बोलायचं झाल्यास, 2018 मध्ये 22 टक्के त्यांच्या पगारात वाढ झाली. कंपनीकडून सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज कमिशनला देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर, कूक यांना 2018 मध्ये एकूण 15.7 मिलीयन डॉलरचा भरणा देण्यात आला. भारतीय रूपयांमध्ये याची तुलना केल्यास हे जवळपास 110.98 कोटी रूपये होते. यात 84 कोटींहून अधिक बोनससोबतच अन्य भत्ते आणि शेअर याचाही समावेश आहे. 

कूक यांना देण्यात आलेल्या शानदार बोनससाठी कंपनीनं म्हटलं की, त्यांच्या नेतृत्त्वात कंपनीनं चांगलं प्रदर्शन केलं. कंपनीनुसार, 2018 मध्ये आम्ही 265.6 अरब डॉलरची शुद्ध विक्री केली आणि 70.9 अरब डॉलरचं ऑपरेटिंग उत्पन्न मिळवलं. यामुळे पहिल्यावेळी कूक यांना 2017 मध्ये 65 कोटी रूपयांचा बोनस मिळाला होता. 

गेल्या पाच वर्षांच्या आकड्यांवर नजर टाकल्यास कूक यांना जवळपास 300 कोटींच्या आसपास बोनस मिळाला आहे. यात सर्वात जास्त कमाई कंपनीच्या शेअर्समधून राहिली आहे. अॅप्पलच्या 4 अन्य अधिकाऱ्यांनाही जवळपास 28 कोटी रूपयांचा बोनस मिळाला. मार्केट कॅपिटलाइजेशनच्या सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या यादीत अॅपल आता अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गूगलनंतर चौथी सर्वांत मोठी कंपनी बनली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी