ग्राहकांसाठी खुष खबर : जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा खास प्लॅन

फोना-फोनी
Updated Apr 15, 2021 | 15:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

एअरटेलने डिजिटलायझेशनच्या काळात आपल्या विस्तारासाठी मूलभूत स्वरुपाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कंपनीच्या डिजिटल मालमत्तेचा समावेश भारती एअरटेल लि.मध्ये करण्यात येणार आहे.

Airtel to restructure itself to compete Reliance Jio
जिओला टक्कर देण्याची एअरटेलचा नवा प्लॅन 

थोडं पण कामाचं

  • जिओला टक्कर देण्यासाठी प्लॅन
  • एअरटेलकडून कंपनीच्या रचनेत बदल
  • एअरटेल डिजिटल लि.चा समावेश भारती एअरटेलमध्ये

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या रिलायन्स जिओला (Reliance Jio) टक्कर देण्यासाठी जिओची प्रतिस्पर्धी असलेल्या भारती एअरटेलने जोरदार योजना तयार केली आहे. एअरटेल आपल्या पॉलिसीसहीत डिजिटल व्यवसायाच्या क्षेत्रातील संधीवर लक्ष देऊ इच्छिते. यासाठीच एअरटेलकडून कंपनीच्या रचनेत काही बदल केले जाणार आहेत. 

एअरटेल लवकरच डिजिटल, इंडिया, इंटरनॅशनल आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. स्मार्टफोन आणि ब्रॉडबॅंड नेटवर्कच्या विस्तारामुळे डिजिटल क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणावर विस्तार होतो आहे. त्यामुळे एअरटेल डिजिटल लि.चा समावेश भारती एअरटेल या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपनीत करण्यात येईल. इतकेच नव्हे तर संपूर्ण दूरसंचार व्यवसायाला एअरटेल लि या नव्या कंपनीअंतर्गत आणले जाईल. भारती एअरटेलच्या संपूर्ण मालकीची ही कंपनी असेल.

डीडीएच सेवांमध्येही बदल


डिजिटल मालमत्तेव्यतिरिक्त कंपनी डीडीएच सेवांचेदेखील एअरटेल लि.मध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. याआधी या व्यवसायाची १०० टक्के भागीदारी भारती टेलीमीडियाची होती. 
ही पुनर्रचना करण्यामागचा मुख्य उद्देश एनडीसीपीच्या ग्राहकांना एकत्रितरित्या सेवा पुरवणे हा आहे.

भारतीय एअरटेलचा हिस्सा बनेल सर्व डिजिटल मालमत्ता


कंपनी विंक म्युझिक, एअरटेल एक्सस्ट्रिम, एअरटेल थॅक्स, मित्रा पेमेंट्स प्लॅटफॉर्म, एअरटेल एड्स, एअरटेल आयक्यू, एअरटेल सेक्युअर, एअरटेल क्लाऊड आणि भविष्यात आणण्यात येणाऱ्या डिजिटल सेवा या सर्वच डिजिटल व्यवसायाचा समावेश आता भारती एअरटेलअंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे या डिजिटल सेवांच्या विकासात आणि बदलांची पूर्ण जबाबदारी भारतीय एअरटले लि. या कंपनीचीच असणार आहे.  आगामी काळातील आव्हाने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या कंपन्यांच्या धोरणाची आखणी केली जाणार आहे.

जिओची आघाडी

देशाच्या दूरसंचार क्षेत्रात जिओने चांगलीच मुसंडी मारली आहे. जिओने दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केल्यापासून या क्षेत्रातीन कंपन्यांसमोर मोठेच आव्हान निर्माण झालेले आहे. जिओने आपल्या अनेक प्लॅनमुळे देशातील मोठ्या संख्येने ग्राहक जोडून घेतले आहेत. जिओच्या आक्रमक व्यवसायामुळे देशातील काही दूरसंचार कंपन्यांना तोट्याचादेखील सामना करावा लागला आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांसमोर जिओचे तगडे आव्हान आहे. त्यातच अलीकडच्या ग्राॉस अॅडजेस्टेड रेव्हेन्यूच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एअरटेल आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांना हजारो कोटींची रक्कम दूरसंचार खात्याकडे शुल्काच्या रुपात भरावी लागणार आहे. त्याचादेखील या कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठाच बोझा पडणार आहे. 

जिओच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एअरटेलनेदेखील मागील काही वर्षात नवनवीन प्लॅन बाजारात आणले आहेत. याशिवाय आता कंपनी पुनर्रचनेला सामोरी जाणार आहे. यामुळे भविष्यात देशातील डिजिटल व्यवसायात पाय रोवणे एअरटेलला शक्य होणार आहे. देशात डिजिटल व्यवसायाची मोठी बाजारेपठ असून आगामी काळात यातून मोठा महसूल कंपन्यांना मिळणार आहे. जिओने ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी याआधीच मोठी पावले उचलली असून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूकदेखील केली आहे. 

जिओच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी डिजिटल व्यवसायात दमदारपणे उभे राहण्याचा एअरटेलचा प्लॅन आहे. मात्र या स्पर्धेमुळे ग्राहकांचा फायदाच होणार असून त्यांना वाजवी दरात दूरसंचार आणि डिजिटल सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एअरटेलची ही नवीन योजना ही ग्राहकांसाठी तरी खुष खबरच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी