Truecaller वरील कॉल रेकॉर्डिंगच्या फिचरमध्ये झाला बदल, पाहा कसे वापरायचे...

Truecaller Call Recording | ट्रूकॉलरची नवी कॉल रेकॉर्डिंग सुविधा फक्त अॅंड्राइड युजर्ससाठी आहे. जर तुम्ही अॅड्राइड युजर असाल आणि या सुविधेचा वापर करायचा असेल तर तर याची खातरजमा करून घ्या की तुमच्याकडे अॅंड्राइड ५.१ किंवा यानंतरच्या व्हर्जनवर चालणारा स्मार्टफोन आहे. दुसऱ्या कॉलरला याची माहिती नसणार आहे की त्यांचा कॉल रेकॉर्ड करण्यात येतो आहे.

Truecaller Call Recording Feature
ट्रूकॉलरचे कॉल रेकॉर्डिंग फीचर 
थोडं पण कामाचं
  • ट्रूकॉलरचे कॉल रेकॉर्डिंग फीचर
  • अॅंड्राइड ५.१ किंवा यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनवरच वापरता येते फीचर
  • हेडफोनचा वापर करतील तेव्हा कॉल रेकॉर्डिंग होणार नाही

Truecaller Call Recording | नवी दिल्ली : ट्रू कॉलर (Truecaller) हे अॅप लोकप्रिय अॅपपैकी एक अॅप आहे. २०१८ मध्ये ट्रू कॉलरने एक नवीन फीचर  सुरू केले होते. ते फक्त निवडक ग्राहकांसाठीचे होते. या फीचर अंतर्गत ग्राहक आपल्या इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सची रेकॉर्डिंग (Truecaller Call Recording feature) करू शकत होते. त्यावेळेस ही सुविधा घेण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागत होते. मात्र आता तीन वर्षांनी ट्रूकॉलरने पुन्हा एकदा अपडेट सुरू केले आहे. यानुसार ट्रूकॉलरचे सर्व युजर्स आपल्या स्मार्टफोनवर (Smartphone) कॉल रेकॉर्डिंगची सुविधा वापरू शकतात. यामध्ये शुल्क देणारे आणि ने देणारे असे दोन्ही युजर्सचा समावेश आहे. (Truecaller changes the Call Recording feature, see how to activate it)

ट्रूकॉलरची नवी कॉल रेकॉर्डिंग सुविधा

ट्रूकॉलरची नवी कॉल रेकॉर्डिंग सुविधा फक्त अॅंड्राइड युजर्ससाठी आहे. जर तुम्ही अॅड्राइड युजर असाल आणि या सुविधेचा वापर करायचा असेल तर तर याची खातरजमा करून घ्या की तुमच्याकडे अॅंड्राइड ५.१ किंवा यानंतरच्या व्हर्जनवर चालणारा स्मार्टफोन आहे. ट्रूकॉलरच्या अॅंड्राइड युजर्स ही सुविधा मॅन्युअल पद्धतीने वापरू शकतात किंवा ते साइड मेनूमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुविधेवर जाऊन किंवा सेटिंग मेनूमधून ऑटो रेकॉर्ड पर्याय निवडून ऑटो कॉल रेकॉर्डिंग सुविधा सुरू करू शकतात.

हेड फोनचा वापर कराल तर हे फीचर वापरता येणार नाही

ट्रूकॉलरने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या कॉलरला याची माहिती नसणार आहे की त्यांचा कॉल रेकॉर्ड करण्यात येतो आहे. सोबतच ट्रूकॉलर कंपनीने हे देखील स्पष्ट केले की जेव्हा युजर हेडफोनचा वापर करतील तेव्हा कॉल रेकॉर्डिंग होणार नाही. सर्व रेकॉर्डेड कॉल्सला ऑफलाइनदेखील अॅक्सेस केले जाऊ शकते. युजर्स सेटिंग मेनू नॅव्हिगेट करून आणि मग स्टोरेज पर्यायावर जाऊन तिथपर्यत पोचता येते.

ट्रूकॉलर कॉल रेकॉर्डिंग फीचरचा वापर या पद्धतीने करू शकता-

स्टेप १- अॅंड्राइड ९ आणि यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनसाठी

सेटिंग्मध्ये जा- अॅक्सेसिबिलिटीवर जाऊन ट्रूकॉलर कॉल रेकॉर्डिंगला अॅक्सेसिबिलिटीची पर्मिशन द्या.

काही स्मार्टफोनमध्ये युजर्सला
सेटिंग्समध्ये जाऊन- अॅक्सेसिबिलिटीवर जावे लागेल - इथून हे फीचर तुम्हाला इन्स्टॉल करण्यात आलेली सर्व्हिस डाउनलोड केलेल्या अॅप्सवर मिळेल.

स्टेप २- कॉल रिसीव्ह करताना तुम्ही कॉलर आयडी स्क्रीनवरील रेकॉर्ड बटणावर टॅप करू शकता.

गुगलचे पाऊल

गुगलने (Google) प्ले स्टोअरवरील (Play Store) दोन स्मार्ट टीव्ही अॅप्सवर (smart TV apps) बंदी घातली आहे. स्मार्ट टीव्ही रिमोट (Smart TV remote)आणि हॅलोवीन कलरिंग (Halloween Coloring) असे हे दोन अॅप आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरवर हे धोकादायक अॅप आहेत. या अॅपमध्ये सुरक्षेसंबंधीच्या समस्या असल्याचे लक्षात आल्यावर गुगलने हे पाऊल उचलेले आहे. या दोन अॅप्समध्ये धोकादायक जोकर मालवेअर (Joker malware) असल्याचे समोर आले आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी