'या' कंपनीने आणला रंग बदलणारा फोन, तो देखील तुमच्या बजेटमध्ये

Vivo ने भारतात नवीन 5G फोन Vivo V25 Pro लॉन्च केला आहे. हा फोन दोन कलरच्या ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

vivo company has brought a color changing phone in your budget know specifications and price of smartphone
'या' कंपनीने आणला रंग बदलणारा फोन, तो देखील तुमच्या बजेटमध्ये (Vivo) 
थोडं पण कामाचं
  • हा स्मार्टफोन Funtouch OS 12 वर चालतो.
  • यामध्ये 12GB रॅमसह MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे.
  • फोटोग्राफीसाठी 64MP प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

मुंबई: Vivo V25 Pro बुधवारी भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM सह MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरवर आधारित आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64MP रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे याच्या मागील बाजूस कलर चेंजिंग ग्लास पॅनल आहे. या फोनच्या मागील बाजूस AG ग्लास वापरण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशात त्याचा रंग सारखा बदलतो. (vivo company has brought a color changing phone in your budget know specifications and price of smartphone)

Vivo V25 Pro किंमत

Vivo V25 Pro च्या बेस 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे आणि टॉप 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, विवो ऑनलाइन स्टोअर आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकतील. 25 ऑगस्टपासून ते ब्लॅक आणि ब्ल्यू कलर पर्यायांमध्ये विकले जाईल. Vivo V25 Pro चे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर रु. 3,500 ची सूट मिळेल.

अधिक वाचा: अबब... बाईकची किमंत Scorpio पेक्षाही जास्त, BMW च्या तीन नवीन लक्झरी बाईक भारतात लाँच

Vivo V25 Pro चे स्पेसिफिकेशन

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Funtouch OS 12 वर चालतो आणि फुल-HD + (2,376x1,080 pixels) 6.56-इंचाचा AMOLED डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB रॅमसह MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, 64MP प्रायमरी रिअर कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा त्याच्या मागील बाजूस देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोन अनलॉक करण्यासाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

अधिक वाचा: Motorola ने लॉन्च केला तब्बल 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, किंमत...

Vivo V25 Pro ची बॅटरी 4,830mAh क्षमतेची आहे आणि 66W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे याच्या मागील बाजूच्या काचेच्या पॅनेलचा रंग बदलतो.

दरम्यान, या स्मार्टफोनचे फीचर्स लक्षात घेता आणि त्याची किंमत पाहता या स्मार्टफोनला तुफान प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीला वाटते आहे. त्यामुळेच कंपनीने हा फोन एका वेगळ्या पद्धतीने डिझाइन केला आहे. आता याला नेमका प्रतिसाद मिळतो हे आपल्याला येत्या काही दिवसातच समजून येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी