50MP कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह Vivo चा नवा 5G फोन भारतात लाँच

फोना-फोनी
Updated Jan 27, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vivo Y75 5Gला भारतात गुरूवारी लाँच करण्यात आले. या हँडसेटचा टीझर काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आला होता. या फोनमध्ये फ्लॅट डिझाईन देण्यात आली आहे. यात रिअरमध्ये 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअपही आहे. 

Vivo Y75 5G
50MP कॅमेरा, मोठ्या बॅटरीसह Vivo चा नवा 5G फोन भारतात लाँच 
थोडं पण कामाचं
  • Vivo Y75 5G चे सिंगल 8GB + 128GBव्हेरिएंटची किंमत २१,९९० रूपये ठेवण्यात आली आहे. 
  • हा स्मार्टफोन अँड्रॉईड १२ बेस Funtouch OS 12वर चालतो
  • सेल्फीसाठी याच्या फ्रंटला 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. 

मुंबई: Vivo Y75 5Gला गुरूवारी भारतात लाँच करण्यात आले. या हँडसेटचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये फ्लॅट डिझाईन देण्यात आली आहे. याच्या रेअरमध्ये 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याची बॅटरी 5,000mAh इतकी आहे आणि यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo Y75 5Gच्या सिंगल 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत २१,९९० रूपये ठेवण्यात आली आहे. यात ग्लोईंग गॅलॅक्सी आणि स्टारलाईट ब्लॅक कलर ऑप्शन देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वीवो इंडिया ई स्टोर आणि पार्टनर रिटेल स्टोर्सवरून तुम्ही खरेदी करू शकता. 

Vivo Y75 5G चे स्पेसिफिकेशन

ड्युअल सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड १२ बेस Funtouch OS 12 वर चालतो. यात 6.58-इंच(1,080x2,408 पिक्सेल) फुल -HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह ओक्टाकोर  MediaTek Dimensity 700 आहे. 

अधिक वाचा - दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी

Vivo Y75 5Gच्या रेयरमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मायक्रो कॅमेरा आणि 2MP बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच सेल्फीसाठी याच्या फ्रंटला 16MP कॅमेरा आहे. 

कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने पाहायचे झाल्यास Vivo Y75 5G मध्ये 5G, 4G LTE, Bluetooth 5.1, Wi-Fi, GPS  आणि FM रेडिओचा सपोर्ट आहे. याची बॅटरी 5,000mAh इतकी आहे. याला 18W फास्ट चार्जिंग सपोर्टही आहे. चार्जिंगसाठी USB  टाईप सी सपोर्ट युजर्सला मिळेल. 

अधिक वाचा -  Video: रेल्वेत मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे का?

Vivo V23 5G वर बंपर सूट

Vivo V23 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर २९९९० रूपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर यापूर्वीत १४ टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच यावर बँक ऑफर देखील लागू असल्याने ग्राहक यावर अधिक बचत करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे जे ग्राहक एचडीएफसी (HDFC) बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत आहेत त्यांना त्यावर १० टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. ज्यामध्ये ग्राहक सुमारे २५०० रुपये वाचवू शकतात. यामधील सर्वात आकर्षित करणाऱ्या ऑफर बद्दल भाष्य करायचे झाले तर, विवो वी २३ (Vivo v23) स्मार्टफोनच्या खरेदीवर १६९५० रूपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. हा बोनस पूर्णपणे लागू केल्यास ग्राहक सुमारे १३०४० रुपयांची बचत करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी