व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी खूशखबर...डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा

Vodafone Recharge: व्होडाफोन आपल्या दोन प्लानवर दुप्पट डेटा देत आहे आणि यासोबतच या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील मिळत आहे. जाणून घ्या पूर्ण प्लान. 

Vodafone Recharge Plan
व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी खूशखबर,डेटा- फ्री कॉलिंगची सुविधा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • व्होडाफोन आपल्या प्रसिद्ध प्रीपेड पॅकवर डबल डेटा लाभ देण्यास सुरूवात केली आहे.
  • कंपनी 199 रूपयांच्या प्रीपेड प्लानवर 1.5 जीबी अतिरिक्त डेटा दररोज आणि 399 रूपयांचा प्रीपेड प्लानवर 1 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.
  • हा लाभ निवडक भागांमध्ये उपलब्ध आहे आणि लिमिटेड कालावधीसाठी आहे.

व्होडाफोन आपल्या प्रसिद्ध प्रीपेड पॅकवर डबल डेटा लाभ देण्यास सुरूवात केली आहे. कंपनी 199 रूपयांच्या प्रीपेड प्लानवर 1.5 जीबी अतिरिक्त डेटा दररोज आणि 399 रूपयांचा प्रीपेड प्लानवर 1 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. हा लाभ निवडक भागांमध्ये उपलब्ध आहे आणि लिमिटेड कालावधीसाठी आहे. यामध्ये व्होडाफोन 199 रूपयांच्या प्लानमध्ये 84 जीबी डेटा देत आहे. तर 399 रूपयांच्या प्लानमध्ये 168 जीबी डेटा मिळत आहे. व्होडाफोन इंडियानं ट्विटरवर आपल्या अनलिमिटेड सुपर प्लानची घोषणा केली आहे. जी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डबल डेटा ऑफर मिळत आहे. 

व्होडाफोनच्या 199 रूपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर, 100 एसएमएस दररोज आणि 1.5 जीबी डेटा मिळत आहे. कंपनी आता या प्लानमध्ये 1.5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. ज्यानंतर ग्राहकांना एकूण 84 जीबीचा डेटा मिळेल. ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळेल. 

याच प्रकारे 399 रूपयांच्या प्लानमध्ये सामान्यत: 1 जीबी डेटा दररोज मिळत होता. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि 84 दिवसांच्या वैधता मिळत होती. आता कंपनी या प्लानसोबत 1 जीबी अतिरिक्त डेटा दररोज देणार आहे. ज्यानंतर या प्लानमध्ये एकूण 168 जीबी डेटा मिळत आहे. दोन्ही प्लानमध्ये व्होडाफोन प्ले कंटेंटचा फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. 

सध्या या दोन्ही ऑफर निवडक सर्किलमध्ये उपलब्ध आहेत. रिपोर्टसनुसार, हा प्लान मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहे. आशा आहे की, लवकरच ही ऑफर अन्य सर्कलमध्येही लॉन्च करण्यात येईल. यासोबतच रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, हा प्लान आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, चेन्नई, कर्नाटक, केरळ सर्कलमध्ये सुद्धाही उपलब्ध आहे. ग्राहकांना माय व्होडफोन अॅप किंवा व्होडाफोनची वेबसाईटवरून या प्लानची उपलब्धता चेक करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी