स्वस्तात मस्त प्लान, दिवसाला मिळणार ३ जीबी डेटा

फोना-फोनी
Updated May 18, 2020 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्ही मोठ्या प्रमाणात डेटा वापरत असाल आणि १.५ जीबी अथवा २ जीबी दिवसाला पुरत नसेल तर तुम्ही दिवसाला ३ जीबी डेटा देणारे प्लान निवडू शकता.

vodafone-idea, airtel and reliance jio data plans offer daily 3 gb data
स्वस्तात मस्त प्लान, दिवसाला मिळणार ३ जीबी डेटा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाकडून असे अनेक प्लान ऑफर केले जात आहेत.
  • यात युजर दिवसाला ३ जीबी डेटा वापरू शकतात. डबल डेटा ऑफरही युजर्सना मिळत आहे.
  • अनेक इंटरनेट युजरकडे ब्रॉडबँड कनेक्शन नाही आणि मोबाईल डेटाच्या मदतीने त्यांना इंटरनेट वापरावे लागत आहे.

मुंबई: जर लॉकडाऊनमध्ये तुमचा दररोजचा डेटा संपत आहे आणि १.५ जीबी अथवा २ जीबी डेटा पुरत नाही तर तुम्ही दररोज ३ जीबी डेटा ऑफर देणारे प्लान निवडू शकता. अनेक इंटरनेट युजरकडे ब्रॉडबँड कनेक्शन नाही आणि मोबाईल डेटाच्या मदतीने त्यांना इंटरनेट वापरावे लागत आहे. जर तुम्हालाही दररोज अधिक डेटा वापरण्याची गरज आहे तर रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांच्याकडून दिवसाला ३ जीबी डेटा देणारे अनेक प्लान्स आहेत. तुम्ही यातून तुमच्यासाठी चांगला प्लान निवडू शकता.

रिलायन्स जिओ

जिओने आपल्या युजरसाठी दररोज ३ जीबी डेटा देणारा प्लान आणला आहे. जिओ एक प्लान अनेक दिवसांपासून देत आहे यात २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज ३ जीबी डेटा मिळतो. जिओ टू जिओ फ्री अनलिमिटेड कॉलिंग असलेल्या या प्लानमध्ये इतर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. दररोज १०० एसएमएस फ्री देणाऱ्या या प्लानची किंमत ३४९ रूपये आहे.

कंपनीकडून नुकताच नवा प्लान जाहीर करण्यात आला आहे आणि ३ जीबी डेटा प्लानमध्ये मोठी वैधताही देण्यात आली आहे. ९९९ रूपयांच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी ३ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळू शकते. तसेच बाकी नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स देण्यात आले आहेत.

एअरटेल

एअरटेलकजून दररोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाणारे दोन प्लान्स आहेत. यातील बेस्ट प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह असून याची किंमत ४०१ रूपये आहे. कमी व्हॅलिडिटी असतानाही या प्लानसोबत युजरला Disney+Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन मिळते.

यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. दुसऱ्या ५५८ रूपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा दिला जातो तसेच ZEE5  चे सबस्क्रिप्शनही आणि डिव्हाईससाठी फ्री अँटी व्हायरस मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानची व्हॅलिडिटी ५६ दिवस आहे.

वोडाफोन-आयडिया

याच्या युजर्सना दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे अनेक प्लान्स आहेत. डबल डेटा ऑफरच्या मदतीने कंपनी ५९९ रूपयांच्या प्लानमध्ये युजरना दररोज ३ जीबी डेटा देत आहे. या आधी या प्लानमध्ये केवळ १.५ जीबी डेटा दिला जात होता. डबल डेटा ऑफरसोबत डेली डेटा ३जीबी इतका करण्यात आला आहे. ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लानमध्ये वोडाफोन प्ले आणि ZEE5चे सब्स्क्रिप्शन फ्री मिळते.

दुसरा डबल डेटा ऑफर असणाऱ्या या प्लानची किंमत ३९९ रूपये इतकी आहे. यात युजरला तीन जीबी डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी ५६ रूपये आहे यातही वोडाफोन प्ले आणि ZEE5 चे सबस्क्रिप्शन मिळते. दोनही प्लान्समध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.

कंपनीकडून आणखी दोन प्लान देशभरात ऑफर केले जात आहेत. यात ३ जीबी डेटा कोणत्याही ऑफरशिवाय मिळत आहे. पहिल्या ५५८ रूपयांच्या प्लानम्ये ५६ दिवस तर दुसऱ्या ३९८ रूपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. दोन्ही प्लान सर्व नेटकर्ववर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस आणि ZEE5 चे फ्री सबस्क्रिप्शन देतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी