Vodafone - Idea च्या ग्राहकांना झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय

Vodafone Idea plans: वोडाफोन-आयडिया कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांना एक झटका बसला आहे. 

vodafone idea company discontinue three plans read in marathi
Vodafone - Idea च्या ग्राहकांना झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय 

vi discontinue three plans: वोडाफोन - आयडिया कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून तोट्यात आहे. एकीकडे रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी 5G सेवेला सुरुवात केली आहे. तर वोडाफोन-आयडिया युजर्सला अद्यापही 5G सेवेची वाट पहावी लागत आहे. याच दरम्यान टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाने आपल्या पोस्टपेड युजर्सला एक मोठा झटका दिला आहे. कंपनीकडून आपला प्रसिद्ध असलेला RedX पोस्टपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (vodafone idea company discontinue three plans read in marathi)

वोडाफोन-आयडियाचे कोणते प्लान बंद?

Vodafone-Idea कंपनीकडून 1099 रुपये, 1699 रुपये आणि 2299 रुपयांचे RedX Plans बंद करण्यात आले आहेत. 

1099 रुपयांचा प्लान

वोडाफोन-आयडिया (Vi) चा 1099 रुपयांचा RedX पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा होती. तसेच दररोज 100 SMS मिळत होते. या प्लानमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Vi Movies and TV आणि Netflix फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येते. या प्लानमध्ये एका वर्षात चारवेळा कोणत्याही अतिरिक्त किमतीच्या इंटरनॅशनल आणि लोकल फ्लाईट दरम्यान एअरपोर्टवर लाऊंजची सुविधा देण्यात येत होती.

हे पण वाचा : या कारणांमुळे Love मॅरेज यशस्वी होतात

Vi चा 1699 रुपयांचा प्लान

Vi च्या 1699 रुपयांच्या RedX प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच दररोज 100 SMS, प्रत्येक महिन्याला 3000 SMS देण्यात येतात. या प्लानमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Vi movies and TV आणि Netflix फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच या प्लानमध्ये एका वर्षात चारवेळा इंटरनॅशनल आणि लोकल फ्लाईट दरम्यान एअरपोर्टवर लाऊंजची सुविधा देण्यात येत होती.

हे पण वाचा : दारू प्यायल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते?

2999 रुपयांचा प्लान

या RedX प्लानमध्ये अनलिमिटेड डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत होती. तसेच दररोज 100 SMS देण्यात येत होते. यासोबतच प्रत्येक महिन्याला 3000 SMS देण्यात येत होते. या प्लानमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Vi Movies and TV आणि Netflix चं फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत होतं. या प्लानमध्ये एका वर्षात चारवेळा इंटरनॅशनल आणि लोकल फ्लाईट दरम्यान एअरपोर्टवर लाऊंजची सुविधा देण्यात येत होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी