मुंबई : देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी असलेल्या वोडाफोन आयडिया (वीआय) ने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षित करण्यासाठी नव्या टेक्नोलॉजीचा वापर करत नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, आता वोडाफोन-आयडियाचे ग्राहक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून थेट आपला मोबाइल रिचार्ज करु शकतात. यामुळे आता ग्राहक कुठल्याही अॅपशिवाय आपला फोन रिचार्ज करु शकतात. (Vodafone Idea customers can recharge via WhatsApp also can pay bills)
Vi युजर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अवघ्या दोन क्लिक्समध्ये कुठल्याही प्रीपेड पॅकची सदस्यता घेऊ सकतात. सध्यस्थितीत वोडाफोन-आयडिया व्यतिरिक्त इतर कुठलीही ऑपरेटर कंपनी आपल्या ग्राहकांना अशाप्रकारची रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही. वोडाफोन-आयडिया पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहक आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेमेंटही करु शकतात. वोडाफोन-आयडियाच्या एका रिलीजनुसार, कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि वेगवान, सोपे करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे.
या सुविधेमुळे आता पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातन थेट रिचार्ज आणि पेमेंट करु शकतात. वोडाफोन आयडियाने ही व्यक्तिगत देय सेवा सर्व पेमेंट गेटवे वर काम करेल असं म्हटलं आहे. गेल्यावर्षी व्हॉट्सअॅपवर आपल्या युजर्ससाठी सर्व्हिस चॅटबॉट लॉन्च करणारी वोडाफोन-आयडिया पहिली ऑपरेटर कंपनी बनली होती. या चॅटबॉटचं नाव VIC असं ठेवण्यात आलं होतं.
VIC एक AI पावर्ड वर्च्युअल असिस्टंट आहे जे कंपनीच्या ग्राहकांना खूपच वेगाने प्रतिक्रिया देण्यास मदत करतो. यासोबतच ग्राहकांना नव्या प्लान्सच्या पेमेंट करण्यास आणि सदस्यता घेण्याची परवानगी देतं.
जेव्हा युजर्स VIC च्या माध्यमातून पेमेंट करु इच्छितो तेव्हा त्यांना एका एसएमएसच्या माध्यमातून एक लिंक प्राप्त होईल. यासोबतच ही लिंक मिळवण्यासाठी 96542-97000 (VIC) नंबरवर एसएमएस सुद्धा पाठवू शकतात.