वोडाफोन-आयडियाने संपूर्ण देशभरात आपल्या फॅमिली पोस्टपेड प्लानच्या किमतीत वाढ केली आहे. वोडाफोन-आयडियाने काही महिन्यांपूर्वी देशातील काही सर्कर्ल्समध्ये फॅमिली पोस्टपेड प्लानच्या किमती वाढवला होत्या. मात्र, आता कंपनीने संपूर्ण देशात ही वाढ लागू केली आहे. वोडाफोन-आयडियाच्या दोन एन्ट्री लेवल पोस्टपेड प्लान्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. 598 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून आता 649 रुपये आणि 749 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून आता 799 रुपये करण्यात आली आहे. वोडाफोन-आयडिया आपल्या प्लान्सच्या किमती वाढवण्याचं बोललं जात होतं. मात्र, कंपनीने एकदम वाढ करुन ग्राहकांना एक झटका दिला आहे. (Vodafone idea increase some plan prices)
598 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून आता 649 रुपये आणि 749 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून आता 799 रुपये करण्यात आली आहे. या किमती टॅक्स वगळून आहेत. 649 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लान दोन कनेक्शन (एक प्राथमिक आणि एक अॅड ऑन कनेक्शन) देतो. यामध्ये ग्राहकांना 80GB डेटा (प्रायमरीसाठी 50GB आणि सेकंडरी कनेक्शनसाठी 30GB) सोबत अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि प्रति महिना 100 SMS मिळतात.
799 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लानमध्ये तीन कनेक्शन (एक प्राथमिक आणि दोन अॅड ऑन कनेक्शन) सह उपबल्ध आहेत. यामध्ये 120GB डेटा (प्राथमिकसाठी 60GB आणि इतरांसाठी 30GB डेटा प्रत्येकी). यासोबतच 799 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, प्रति महिना 100 SMS आणि ओटीटी सब्सस्क्रिप्शन फ्री मिळतो.
948 रुपये, 999 रुपये आणि 1349 रुपयांचे फॅमिली पोस्टपेड प्लान्सही उपलब्ध आहेत. 948 रुपयांचा पोस्टपेड प्लान हा मुख्यत: 649 रुपयांचा वैयक्तिक इंटरटेन्मेंट प्लस प्लान आहे. 249 रुपयांचा आणखी एक अॅड ऑन कनेक्शन आहे ज्याचा अर्थ आहे की, हा दोन कनेक्शनसाठी लाभदायक आहे. प्राथमिक कनेक्शन असलेला युजर अनलिमिटेड डेटाचा आनंद घेऊ शकतो (प्रति महिना 150GB तर सेकंडरी कनेक्शनसाठी प्रति महिना 30GB डेटा मिळणार). 948 रुपयांच्या प्लानमध्ये 249 रुपयांच्या प्रति महिना एकूण 5 अॅड ऑन कनेक्शन जोडता येऊऊ शकतात. वोडाफोन-आयडियाचा 999 रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लान हा सर्वात चांगला पर्याय आहे. कारण, यामध्ये पाच कनेक्शन (एक प्राथमिक आणि चार सेकंडरी कनेक्शन) मिळतात. तर एकूण 200GB डेटा ग्राहकांना मिळतो.