वोडाफोननं आणला नवीन रिचार्ज प्लान, वाढली ‘या’ प्लानची वैधता

फोना-फोनी
Updated Feb 10, 2020 | 22:33 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Vodafone Recharge Plan: वोडाफोननं नवीन प्रीपेड प्लान जाहीर केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज डेटा आणि एसएमएससोबतच फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल.

Vodafone Recharge Plan
वोडाफोनचा आणखी एक नवीन प्रीपेड प्लान बाजारात  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वोडाफोनचा आणखी एक नवीन प्रीपेड प्लान बाजारात
  • ४९९ रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लानमध्ये मिळणार ७० दिवसांची वैधता
  • यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध

नवी दिल्ली: वोडाफोननं ४९९ रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान जाहीर केला आहे. हा प्लान २४९ रुपये, ३९९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानच्या कॅटेगिरीमध्ये येईल. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. यासोबतच कंपनीनं ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. या प्लानमध्ये आता अधिक वैधता मिळेल. कंपनीनं ५५५ रुपयांच्या या प्लानची वैधता आधी ७० दिवस होती आता ही वाढवून ७७ दिवस करण्यात आलीय. तर ४९९ रुपयांचा प्लान आता ७० दिवसांसाठी उपलब्ध असेल. हा प्लान काही सर्कलमध्ये ६० दिवसांसाठी उपलब्ध असेल.

५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर ७० दिवसांची वैधता मिळते. वोडाफोन आपल्या प्रीपेड पोर्टफोलियोला खूप वाढवत आहे, यात कंपनीनं ४९९ रुपयांचा नवीन रिचार्ज प्लान वाढवलाय. या प्लानची वैधता दोन सर्कलमध्ये वेगवेगळी उपलब्ध आहे.

वोडाफोनच्या ४९९ रुपयांच्या प्लानचे फायदे

वोडाफोन-आयडिया कंपनीला सध्या देशभरात संघर्ष करावा लागतोय. कंपनीची आर्थिक परिस्थिती ठीक नाहीय. असं असलं तरी कंपनी नवीन-नवीन प्लान लॉन्च करत रेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. वोडाफोननं याच क्रमात ४९९ रुपयांचा नवीन रिचार्ज प्लान जाहीर केला आहे.

आयडियानं सुद्धा हा प्लान काही ठराविक सर्कलमध्ये जाहीर केला आहे. वोडाफोनच्या २४९ रुपये, ३९९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानसारखाच हा प्लान सुद्धा ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळेल.

याशिवाय मिळत असलेल्या फायद्यांमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा प्रदान करत आहे. या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंगच्या शिवाय १०० एसएमएस दररोज मोफत मिळणार आहेत. सोबतच वोडाफोन प्लेचं मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा मिळत आहे. ज्यात विविध ओटीए प्लॅटफॉर्म्सचं सब्सक्रिप्शन पण मिळेल. या प्लानमध्ये पूर्णपणे फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते, जिओ सारखीच यात कुठलीही ऑफ नेट कॉलिंग कॉस्ट लागत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी