शाओमीचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

फोना-फोनी
Updated Jul 03, 2019 | 18:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Xiaomi Mi CC9: शाओमी कंपनीने आपले दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यासोबतच एक स्पेशल एडिशन स्मार्टफोनही लॉन्च केला आहे. पाहूयात शाओमी Mi CC9 सीरिजच्या या स्मार्टफोनची काय खास बाब आहे.

Xiaomi mi cc9 and mi cc9e smartphone launched
शाओमीचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शाओमी कंपनीने चीनमध्ये आपले दोन स्मार्टफोन Mi CC9 आणि Mi CC9e लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, ग्रेडिएंट पॅनल आणि वॉटर ड्रॉप नॉचसह उपलब्ध आहेत. मुख्य फिचरचं बोलायचं झालं तर या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4030 mAh ची बॅटरी, 32MP चा सेल्फी कॅमेरा, 48MP चा रियर कॅमेरा, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे. Mi CC9 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर तर MI CC9e स्मार्टफोनमध्ये 665 प्रोसेसर देण्यात आला आहे.

शाओमीने Mi CC9 स्मार्टफोनचा Meitu एडिशन सुद्धा लॉन्च केला आहे. हा एक कस्टम एडिशन आहे. या एडिशनमध्ये सुद्दा सर्व फिचर Mi CC9 सारखेच देण्यात आले आहेत. मात्र, या फोनमध्ये रॅम आणि स्टोरेजची क्षमता अधिक देण्यात आली आहे. 

Xiaomi Mi CC9, Mi CC9e ची किंमत

शाओमीच्या Mi CC9 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंची किंमत 1,799 युआन (जवळपास 18,000 रुपये) आहे. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (जवळपास 20,000 रुपये) आहे. हा स्मार्टफोन ब्लू प्लानेट, डार्क प्रिंस आणि व्हाइट लवर या रंगांत उपलब्ध आहे. शाओमी Mi CC9e या स्मार्टफोनची किंमत 1,299 युआन (जवळपास 13,000 रुपये) पासून सुरू होत आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे.

cc9

फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 युआन (जवळपास 14,000 रुपये) आहे. तर, 6GB रॅम आणि  128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,000 रुपये) इतकी आहे. Mi CC9 Meitu एडिशनची किंमत 2,599 युआन (जवळपास 26,000 रुपये) आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे.

स्मार्टफोनचे फिचर्स...

MI CC9 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड पाय वर आधारित Mi यूआय10 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फूल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरवर काम करतो, जो 6GB रॅम आणि 128Gb पर्यंत स्टोरेजच्या पर्यायासह उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48MP, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजुला 32MPचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4030 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉल्टच्या फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक, गेम ट्रबो 2.0 मोड सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शाओमीचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स Description: Xiaomi Mi CC9: शाओमी कंपनीने आपले दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यासोबतच एक स्पेशल एडिशन स्मार्टफोनही लॉन्च केला आहे. पाहूयात शाओमी Mi CC9 सीरिजच्या या स्मार्टफोनची काय खास बाब आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola