Xiaomi Mi Super Sale: शाओमीच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना बनवत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, शाओमीने एक खास सुपर सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर्स मिळत आहेत.

xiaomi mi super sale
शाओमीच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट 

थोडं पण कामाचं

  • शाओमीचा एमआय सुपर सेल 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान
  • या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर 8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
  • एचडीएफसी डेबिट कार्डवर 5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआय आणि एस्कचेंज ऑफर्स सुद्धा मिळत आहेत

मुंबई: शाओमी कंपनीने पुन्हा एकदा आपला 'Mi Super Sale' सुरू केला आहे. या सेलची सुरूवात झाली असून 18 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. सेलमध्ये तुम्हाला शाओमीच्या विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये स्मार्टफोनवर 8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट तर काही स्मार्टफोन्सवर 2000 रुपयांचा अतिरिक्त एमआय एक्सचेंज डिस्काऊंट मिळत आहे. अतिरिक्सत एक्सचेंज डिस्काऊंट ऑफर शाओमी एमआय ए2, रेडमी वाय 2 आणि पोको एफ1, स्मार्टफोनवर मिळत आहे. रेडमी नोट 7 प्रो, रेडमी नोट 7 एस, रेडमी 7, रेडमी 7A, रेडमी 6, रेडमी 6 प्रो आणि इतरही स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट मिळत आहे.

रेडमी नोट 7 एस

रेडमी नोट 7 एस आणि रेडमी नोट 7 प्रो साइटवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. रेडमी नोट 7 एस स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. या फोनच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे जो या सेलमध्ये 9,999 रुपयांत मिळत आहे. तर 11,999 रुपयांत या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करता येणार आहे.

अतिरिक्त डिस्काऊंट

या व्यतिरिक्त इतर डिस्काऊंट अंतर्गत एचडीएफसी डेबिट कार्ड ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय, एमआय एक्सचेंजचा पर्याय, एअरटेल ग्राहकांना 1120 GB पर्यंतचा डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळत आहे.

रेडमी नोट 7 प्रो

तर, रेडमी नोट 7 प्रो हा स्मार्टफोन तुम्ही 13,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकता. ही किंमत स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांत मिळत आहे. तर फोनचं 64GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिएंट तुम्ही 16,999 रुपयांत खरेदी करु शकता. शाओमीच्या मते रेडमी नोट 7 प्रो या स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे. 

रेडमी वाय 3

रेडमी वाय 3 स्मार्टफोन सुद्धा तुम्ही या सेलमध्ये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. हा फोन 8,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत उपलब्ध आहे. या फोनवर कंपनी 3 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट देत आहे. यासोबतच 1000 रुपयांचा एक्सचेंज ऑफरही मिळत आहे.

रेडमी 7

रेडमी 7 या स्मार्टफोनवर 2500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 7,499 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकता. या फोनसह 349 रुपयांचा एमआय स्क्रीन प्रोटेक्शन फ्री मिळत आहे. तर रेडमी 7 ए स्मार्टफोन तुम्ही 5,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकता. या स्मार्टफोनसह दोन वर्षांची वॉरंटी मिळत आहे.

8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

पोको एफ 1 स्मार्टफोन तुम्ही 17,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकता. या फोनवर 8 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. सोबतच या फोनवर 2000 रुपयांची एमआय एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. एमआय ए2 स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकतात. या फोनवर 7500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. तसेच 1000 रुपयांचा अतिरिक्त एमआय डिस्काऊंट मिळत आहे. तर रेडमी 6 प्रो स्मार्टफोनवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे त्यामुळे हा फोन तुम्ही 8,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Xiaomi Mi Super Sale: शाओमीच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट Description: तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना बनवत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, शाओमीने एक खास सुपर सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर्स मिळत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...