Redmi Y: रेडमी वाय  ३ सोबत लॉन्च होईल हा स्मार्टफोन, शाओमीनं दिली हिंट

फोना-फोनी
Updated Apr 19, 2019 | 18:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

शाओमी रेडमी वाय ३:  चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी भारतात २४ एप्रिलला दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. रेडमी वाय ३ च्या लॉन्चिंगसोबत कंपनी रेडमी ७ स्मार्टफोन देखील लॉन्च करू शकते.

xiaomi redmi 7
Redmi Y: रेडमी वाय  ३ सोबत लॉन्च होईल हा स्मार्टफोन, शाओमीनं दिली हिंट 

Redmi Y 3 Smartphone: शाओमी आपला नवीन स्मार्टफोन रेडमी वाय ३ या महिन्याच्या २४ तारखेला लॉन्च करणार आहे. मात्र कंपनी २४ एप्रिलच्या इव्हेंटमध्ये कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतः कंपनीनं याबाबतची हिंट दिली आहे. रेडमी इंडियाद्वारे करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये याबाबतचे संकेत मिळत आहेत. कंपनीनं जे ट्विट शेअर केलं आहे त्यात बऱ्याच जागांवर ७ अंकावर जोर दिला गेला आहे. त्यामुळे हा अंक असे संकेत देतो की एकतर कंपनी याच्या निगडीत काही घोषणा करेल नाहीतर लॉन्चिंग करू शकते. 

काही रिपोर्ट्समध्ये हे सांगितलं आहे की, रेडमी ७ लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो. गुरूवारी शाओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी एक फोटो ट्विट करत माहिती दिली की, रेडमी वाय सिरीजनं ७० लाख युनिट्सची शिपमेंटचा आकडा पार केला आहे. त्यांनी लिहिलं की, ही कामगिरी विशेष आहे. मात्र '७' लक्ष का वेधून घेत आहे. वाय 7 ?  जर का तुम्ही समजत असाल तर रिट्विट करा. 

या ट्विटमुळे असे संकेत मिळत आहेत की, शाओमी रेडमी 7 स्मार्टफोन देखील २४ एप्रिलला लॉन्च करण्याची शक्यता आहे. रेडमी ७ स्मार्टफोन हा पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च होईल. शाओमीसाठी सुरूवातीपासूनच भारत एक मोठा बाजार ठरला आहे. अशातच कंपनी लवकरच हा फोन भारतात लॉन्च करू शकते.  यापूर्वी आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं की, रेडमी 7 ए आणि रेडमी वाय 3 स्मार्टफोन देखील पाइपलाईनमध्ये आहेत. 

आता रेडमी वाय 3 ची लॉन्चिंग २४ एप्रिलला कंफर्म झाली आहे. मात्र रेडमी 7 बद्दल अद्याप कोणतीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे. रेडमी 7 स्मार्टफोन ६.२६ इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसोबत येईल. ज्याला गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शननं प्रोटेक्टेड आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६३२ प्रोसेसर देण्यात आला आहे. जो ४ जीबी रॅमसोबत येईल. फोनमध्ये १२ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमरेचा स्टेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. रेडमी 7 ४००० एमएएमचच्या बॅटरीसह चीनमध्ये लॉन्च झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Redmi Y: रेडमी वाय  ३ सोबत लॉन्च होईल हा स्मार्टफोन, शाओमीनं दिली हिंट Description: शाओमी रेडमी वाय ३:  चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी भारतात २४ एप्रिलला दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. रेडमी वाय ३ च्या लॉन्चिंगसोबत कंपनी रेडमी ७ स्मार्टफोन देखील लॉन्च करू शकते.
Loading...
Loading...
Loading...