Xiaomi K20 Smartphone: एका महिन्यात १० लाख स्मार्टफोनची विक्री, पाहा काय आहेत याचे खास फीचर 

फोना-फोनी
Updated Jul 01, 2019 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Xiaomi K20: शाओमीचे नव्याने लाँच केलेल्या दोन स्मार्टफोनचा ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. कारण महिन्याभरातच या स्मार्टफोनचे तब्बल १० लाख युनिट्स विकले गेले आहेत.

xiaomi_k20_twitter
Xiaomi K20 Smartphone: एका महिन्यात १० लाख स्मार्टफोनची विक्री, पाहा काय आहेत याचे खास फीचर   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शाओमीने मागच्या महिन्यात चीनमध्ये रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले होते. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन हे फ्लॅगशीप फीचरसोबत लाँच केले आहेत. त्यामुळे या फोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेडमी के 20 सीरीजने लाँचिंगच्या एका महिन्याच्या आतच प्रचंड मोठी मजल मारली आहे. हा फोन यूजर्सना प्रचंड आवडला असल्याचं दिसून येत आहे. कारण फक्त महिन्याभरातच या सीरीजचे तब्बल १० लाख युनिट्सची विक्री झाली आहे. अजूनही या स्मार्टफोनला बाजारात बरीच मागणी आहे. 

शाओमी कंपनीचे जागतिक प्रवक्ते डोनोवान सुंग यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'शाओमी रेडमी के 20 सीरीजने चीनमध्ये लाँचिंगच्या एका महिन्यातच १० लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे.' पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, 'ग्रेट न्यूज, Mi फॅन्स. मी खूपच उत्साहित आहे. कारण की, रेडमी के 20 सीरीजने पहिल्या महिन्यातच १० लाख युनिट्सची विक्री केली आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद.' 

दरम्यान सुंग यांनी एक महिन्यात एकूण किती युनिट्सची विक्री झाली आहे याचा नेमका आकडा दिलेला नाही. तसंच त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं नाही की, दोनपैकी कोणत्या फोनची विक्री ही सर्वाधिक झालेली आहे. याआधी मे महिन्यात रेडमी नोट ७ सीरीजने १० लाख विक्रीचा आकडा हा १२९ दिवसात पार केला होता. तर मागील महिन्यात लाँच केलेल्या Mi बँड 4 ने ८ दिवसात १० लाख युनिट्सचा आकडा पार केला होता. चीनमध्ये लाँच केल्यानंतर आता याच महिन्यात हे दोन नवे स्मार्टफोन आता भारतात लाँच करण्यात येणार आहे. शाओमी सतत सोशल मीडियावर या स्मार्टफोन्सबाबत माहिती देत आहे. 

रेडमी के 20  आणि के 20 प्रो स्मार्टफोनचे फीचर

फीचरचा विचार केल्यास दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखेच फीचर देण्यात आले आहेत. यामध्ये फक्त प्रोसेसर आणि चार्जिंगचा फरक आहे. रेडमी के 20 प्रो स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 देण्यात आलं आहे. तर रेडमी के 20 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर देण्यात आलं आहे. दोन्ही फोनचं डिझाइन आणि कॅमेरा सेटअप हा सारखाच आहे. 

या फोनमध्ये 6.39 इंचीचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. या  फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असे एकूण तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Xiaomi K20 Smartphone: एका महिन्यात १० लाख स्मार्टफोनची विक्री, पाहा काय आहेत याचे खास फीचर  Description: Xiaomi K20: शाओमीचे नव्याने लाँच केलेल्या दोन स्मार्टफोनचा ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. कारण महिन्याभरातच या स्मार्टफोनचे तब्बल १० लाख युनिट्स विकले गेले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola