एअरटेलने ग्राहकांना दिली खूप मोठी भेट, पाहा काय मिळणार नेमकं

सोशल सॅव्ही
Updated Nov 04, 2019 | 23:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट आणली आहे. ही खास भेट ग्राहकांना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

airtel gives customers a great gift see what they get
एअरटेलने ग्राहकांना दिली खूप मोठी भेट, पाहा काय मिळणार नेमकं  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • एअरटेलने ग्राहकांसाठी दिली खूप मोठी भेट
  • एअरटेल ग्राहकांना देणार मोफत विमा
  • एअरटेलच्या या ऑफरचा ग्राहकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारती एअरटेलने दिल्लीसह काही निवडक राज्यात प्री-पेड ग्राहकांना ५९९ रुपयांच्या प्लॅनसह चार लाख रुपयांचा जीवन विमा देखील मिळणार आहे. यासाठी भारती अॅक्सा आणि एअरटेलने करार केला आहे. भारतीय एअरटेलने सोमवारी ५९९ रुपयांच्या नव्या प्री-पेड प्लॅनची घोषणा केली. ज्यामध्ये दररोज २ जीबी डेटा प्रतिदिन, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटीडे व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस प्रतिदिन यासारख्या सुविधांसह भारती अॅक्सा लाइफ इंश्युरन्सपासून चार लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. 

दोन्ही कंपन्यांनी संयुक्त पत्रक काढून म्हटलं आहे की, 'या रिचार्जची वैधता ८४ दिवसांसाठी आहे. प्रत्येक रिचार्जसोबत आपल्याला तीन महिन्यांसाठी विमा कव्हर मिळणार आहे. १८ ते ५४ वर्षाच्या सर्व ग्राहकांना विमा सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी फार काही कागदपत्रांची पूर्तता आणि वैद्यकीय तपासणी करावी लागणार नाही. विमाचं प्रमाणपत्र हे डिजिटल माध्यमातून तात्काळ ग्राहकांना वितरित केलं जाईल.' 

आपल्या या निवदेनात कंपनीने असंही म्हटलं आहे की, डिजिटल प्रमाणपत्रासह ग्राहकांच्या घरी त्याची प्रत देखील पाठवली जाईल. ग्राहकांना पहिल्या रिचार्जनंतर एसएमएस, एअरटेल थँक्स अॅप किंवा एअरटेल रिटेलर यांच्या माध्यमातून विमा कव्हरसाठी अर्ज करावा लागेल. कंपनीच्या एका अधिकारीने याबाबत असं म्हटलं की, एअरटेलने ही सेवा दिल्लीसह काही राज्यात लागू केलेली असली तरी ती हळूहळू संपूर्ण देशभरात लागू केली जाईल. 

सरकारकडूनही देशातील प्रत्येक नागरिकाचा विमा असावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तरीही अजून देशातील मोठ्या संख्येनं नागरिकांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. एअरटेलच्या या योजनेनंतर आता कंपनीच्या गाहकांच्या संख्येत आणखी किती वाढ होते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल नंबर एक वर आहे.

IRDAI च्या आकड्यांनुसार, भारतात 4 टक्के लोकांहूनही कमी नागरिकांची विमा पॉलिसी आहे. तर दुसरीकडे 2022 पर्यंत देशातील 38 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करताना दिसतील. याच गोष्टीचा वापर करत एअरटेलनं आता ही विमा स्कीम लॉन्च केली आहे. जेणेकरून स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची विमा पॉलिसी असावी आणि विमा समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहोचावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी