WhatsApp युजर्ससाठी महत्वाची बातमी

WhatsApp: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केली जात आहे. 

alert whatsapp fraud scammers posing s whatsapp technical team and cheat with you
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वरुन एक नवीन घोटाळा समोर आला आहे 
  • मेसेजच्या माध्यमातून युजर्सला आपला व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्यास सांगितले जाते 
  • त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सने काळजी घेण्याची गरज आहे. 

नवी दिल्ली: भारतातील स्मार्टफोन युजर्सपैकी जवळपास बहूतांश युजर्स हे व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र, याच व्हॉट्सअॅपवरुन आता फसवणूक होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. एक नवा स्कॅम समोर आला आहे. युजर्सला सहा अंकांचा व्हेरिफिकेशन कोड विचारून त्यांची व्हॉट्सअॅपवरुन फसवणूक केली जात आहे. हे अधिकृत कम्युनिकेशन असल्याचं हॅकर्स WhatsApp युजर्सला भासवतात आणि त्यानंतर युजर्सला आपला व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्यास सांगतात. स्कॅमर्स आपला WhatsApp DP हा व्हॉट्सअॅपचा लोगो ठेवतात जेणेकरुन कुणालाही संशय येणार नाही. तसं पहायला गेलं तर व्हॉट्सअॅप कडून आपल्याला क्वचितच एखादा मेसेज येतो किंवा कधी येतही नाही. WhatsApp कडून आपली अधिकृत माहिती युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्वीटर किंवा आपल्या अधिकृत ब्लॉगवचा वापर केला जातो. 

या फसवणुकीसंदर्भात सर्वप्रथम WABetaInfo ने निदर्शनास आणलं आणि त्यांनी एक ट्वीट पोस्ट करत नुकत्याच झालेल्या एका स्कॅमच्या संदर्भात दाखवण्यात आले आहे. यामध्ये डारिओ नवारो नावाच्या ट्वीटर युजरने एका फिशी मेसेज संदर्भात सांगितलं होतं. नवारोने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, स्कॅमर्स स्पॅनिश भाषेत एक मेसेज (SMS)  पाठवतो आणि WhatsApp युजरला सहा अंकांचा व्हेरिफिकेशन कोड मागत आपली ओळख सत्यापित करण्यास सांगतो.

WhatsApp चॅटच्या माध्यमातून कोणीही माहिती मागत नाही 

फसवणूक करणारे स्कॅमर्स हे व्हॉट्सअॅपचा लोगो वापरत आहेत यामुळे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म कधीही मेसेज पाठवत नाही. जर तुम्हाला मेसेज केलाच तर त्यावर तुम्हाला व्हेरिफाइड अकाऊंट असल्याचा लोगो दिसेल. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या WhatsApp आपल्या युजर्सकडून कधीही त्यांचा डेटा मागत नाही आणि सहा आकड्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी डेटा मागत नाही.  

WhatsApp ने दिल्या सूचना 

WhatsApp ने आपल्या FAQ सेक्शनमध्ये म्हटलं आहे की, व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे की, युजर्सने आपल्या वेबसाइटवर व्हेरिफिकेशन कोड शेअर करु नये. जर कुणी आपलं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या फोनवर आलेला व्हेरिफिकेशन कोड आवश्यक असेल. या कोड शिवाय कोणताही युजर व्हेरिफिकेश पर्ण करु शकणार नाही आणि तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होणार नाही.  त्यामुळे कोणासोबतही व्हेरिफेकेशन कोड शेअर करु नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी