अखेर व्हॉट्सअॅपमध्ये आले ते फीचर...ज्याची युजर करत होते प्रतीक्षा, लगेच करा अपडेट

सोशल सॅव्ही
Updated Oct 23, 2020 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whatsap features: मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्या फीचरची प्रतीक्षा करत होते ते फीचर अखेर आले आहे. हे फीचर सर्व अँड्रॉईड आणि iOS युजर्ससाठी आहे. 

whatsapp
लगेच करा अपडेट...अखेर व्हॉट्सअॅपमध्ये आले ते फीचर 

थोडं पण कामाचं

  • व्हॉट्सअॅपमध्ये आलेय नवे फीचर
  • लगेच तुम्ही प्ले स्टोरमध्ये जाऊन करा अपडेट
  • नोटिफिकेशन्स आता तुम्ही'Always Mute' करू शकता.

मुंबई: व्हॉट्सअॅपवर(new update in whatsapp) नवे अपडेट आले आहे. तुम्ही ज्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होतात ते फीचर अखेर व्हॉट्सअॅपमध्ये आले आहे. अँड्रॉईड(android) आणि  iOS दोन्ही युजर्ससाठी हे फीचर अपडेट आहे. या दोनही प्लॅटफॉर्मवरल युजर्सला ग्रुप्स अथवा चॅट्सचे नोटिफिकेशन(chats notification) नेहमीसाठी म्युट(mute option) करण्याचा ऑप्शन मिळाला आहे. प्रत्येक युझरच्या व्हॉट्सअॅपमध्ये असे काही ग्रुप्स असतात ज्यांचे सदस्य असणे ही एक प्रकारची मजबुरी असते. हे फॅमिली ग्रुप्सपासून ते ऑफिशियल ग्रुप्सपर्यंत काहीही असू शकतात ज्यांचे मेसेजेस बऱ्याचदा आपल्या कामाचे नसतात. अशा ग्रुप्सचे नोटिफिकेशन आता तुम्ही कायसाठी म्युट करू शकता. तसेच त्यात येणारे मेसेजेसचे फालतू नोटिफिकेशन आता तुम्हाला त्रास देणार नाहीत. 

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटर अकाऊंट ग्रुप्समधील 'Always Mute' या ऑप्शनबद्दल सांगितले. जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या Mute Notificationsच्या सेटिंग्समध्ये जाल तर तुम्हाला तेथे म्युटचा ऑप्शन तुम्हाला 1 Week आणि 8 hours साठी असे. मात्र आता तेथे तुम्हाला Always हा ऑप्शन दिसेल. याआधी तुम्हाला Always च्या ऐवजी 1 Year हा ऑप्शन मिळत होता. याचाच अर्थ तुम्ही एखाद्या ग्रुपला जास्तीत जास्त १ वर्षापर्यंत म्युट करू शकत होतात. एकदा ग्रुप म्युट केल्यानंतर तुम्हाला आता कधीही हे नोटिफिकेशन्स त्रास देणार नाहीत. 

लगेच करा अपडेट

व्हॉट्सअॅपचे हे फीचर दीर्घकाळापासून बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात होते आणि आता अँड्रॉईड आणि iOS दोन्हीवर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलेआहे. जर तुम्हाला आतापर्यंत तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये Always हा ऑप्शन Mute Notifications सेटिंग्समध्ये दिसत नसेल तर लगेचच अॅप स्टोर अथवा गुगल प्ले स्टोरवर जाऊन अॅप अपडेट करण्याची गरज आहे. याआधी व्हॉट्सअॅपने सर्व युजर्सला अँडव्हान्स सर्चचा ऑप्शनही रोलआऊटकेला होता. याच्या मदतीने युजर्स व्हिडिओ, फोटोज, फाईल्स आणि urls फिल्टर करून सर्च करू शकत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी