सट्टेबाजीची जाहीरात दाखवल्यास OTT प्लॅटफॉर्मचं फुटणार नशीब, Bettingवर केंद्र सतर्क

Betting Advertisements : केंद्राने नवीन वेबसाइट्स, OTT प्लॅटफॉर्म आणि खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल्सला बेटिंग साइट्सच्या जाहिराती प्रसारित करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

Center advises OTT and digital media platforms on betting advertisements
सट्टेबाजीची जाहीरात दाखवल्यास OTT प्लॅटफॉर्मचं फुटणार नशीब  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • ओटीटी आणि नवीन वेबसाईट्सला तसेच चॅनेल्सला सट्टेबाजीच्या जाहीराती दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) एक सूचना जारी केली आहे.
  • मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 9 नुसार, बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहेत.

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म (   OTT platform )   लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मोठ्या संख्येने लोक या प्लॅटफॉर्मचा उपयोग करत आहे.  अधिक खप पाहून सट्टेबाजी ( betting ) करणाऱ्या जाहीरातदारांनी  ( advertisements )   आपल्या जाहीराती यावर दाखवण्यास सुरूवात केली. या जाहीरातीवर आता केंद्राची नजर पडली असून भारत सरकार सट्टेबाजीच्या जाहिरातींवर कठोर भूमिका घेत आहे. केंद्राने नवीन वेबसाइट्स, OTT प्लॅटफॉर्म आणि खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल्सला बेटिंग साइट्सच्या जाहिराती प्रसारित करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.(Center advises OTT and digital media platforms if betting advertisements are shown)

अधिक वाचा  : आजपासून सुरू होत आहेत 31 नवीन एसी लोकल ट्रेन

या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) एक सूचना जारी केली आहे. मंत्रालयाने नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ तसेच खासगी उपग्रह टीव्ही चॅनेल सारख्या ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवण्याविरुद्ध ही कठोर सूचना जारी केली आहे.  सरकारच्या सल्ल्याचे पालन न केल्यास लागू कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, "मंत्रालयाच्या निरीक्षणात असे लक्षात आले की, सट्टेबाजीच्या जाहीराती  आणि  काही न्यूज प्लॅटफॉर्म आणि OTT प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत.  यासह असे निदर्शनात आले की, "ऑनलाइन ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मने डिजिटल मीडियावर सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करण्यासाठी बातम्या वेबसाइट्सचा वापर सरोगेट उत्पादन म्हणून करण्यास सुरुवात केली आहे." 

अधिक वाचा  : दसरा मेळाव्यासाठी गर्दी वाढविण्याचं टेन्शन

भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार हे बेकायदेशीर गोष्ट आहे. सरकारने आपल्या सल्लागारात म्हटले आहे की, "ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी आणि फसव्या जाहिरातींना समर्थन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 9 नुसार,  बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहेत.  त्यामुळे ऑनलाइन ऑफशोअर सट्टेबाजी आणि जुगार प्लॅटफॉर्मच्या जाहिराती देखील प्रतिबंधित आहेत.

” माहिती तंत्रज्ञान (डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम 2021 नुसार, मंत्रालयाने म्हटले आहे की बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती ही एक बेकायदेशीर गोष्ट आहे, ज्या डिजिटल मीडियावर दाखवल्या जाऊ शकत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी