सार्वभौमत्वाला धक्का सहन केला जाणार नाही, सरकारचा ट्विटरला कडक इशारा

सोशल सॅव्ही
Updated Oct 22, 2020 | 17:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Twitterने काही दिवसांआधी जम्मू-काश्मीरच्या लेहला जिओ लोकेशन पीपुल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हटले होते. ट्विटरटच्या या जिओ लोकेशनप्रमाणे लेह हा चीनचा भाग आहे.

twitter
सरकारने Twitter ला कडक शब्दात दिलाय इशारा 

थोडं पण कामाचं

  • ट्विटरने काही दिवसांपूर्वी लेहला जिओ लोकेशन चीनचे दाखवले होते. 
  • मायक्रो ब्लॉगिंग साईटने टेक्निकल चूक दाखवत नीट करण्याचा दावा केला.
  • सरकारने सांगितले या प्रकारची चूक सहन केली जाणार नाही. 

मुंबई: सरकारने(central government) गुरूवारी सोशल मीडिया(social media) ट्विटरचे(twitter) सीईओ जॅक डोरसीला पत्र लिहून भारतीय सार्वभौमत्वाला(Sovereignty) कोणत्याही प्रकारचा धक्का दिल्यास सहन केला जाणार नाही असा कडक शब्दात इशारा दिला आहे. सरकारने ट्विटरला इशारा देत म्हटले की देशाची सार्वभौमत्व तसेच अखंडतेला धक्का देण्याचा ट्विटरचा कोणताही प्रकार हा अस्वीकार्य आहे. तसेच या पत्रातून ट्विटरला आठवण करून दिली की लेह हा भारताचा हिस्सा आहे. ट्विटरचे प्रवक्ता यांनी हे पत्र मिळाल्याची गोष्ट स्वीकारली. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ट्विट भारत सरकारसोबत काम करण्यास प्रतिबद्ध आहे. आम्ही या प्रकरणाच्या गंभीरतेचा सन्मान करतो. 

आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या सचिवांनी लिहिले पत्र

रिपोर्टनुसार आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे सचिव अजय साहृ यांनी मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडियाला भारतीय नागरिकांच्या संवेदनशीलतेचा सन्मान करण्यास सांगितले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, भारताची सार्वभौमत्व तसेच अखंडतेला धक्का पोहोचवला जाईल असा ट्विटरचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य आहे.असे करणे कायद्याच्या विरोधातील आहे. 

Twitter

लेहला चीनचा भाग सांगितले होते

ट्विटरने जम्मू-काश्मीरच्या लेहला जिओ लोकेशन पीपुल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हटले होते. ट्विटरच्या या जिओ लोकेशननुसार लेह हा चीनचा भाग आहे. भारताने याचा विरोध केल्याने ट्विटरने याबाबत विधान जारी केले होते आणि म्हटले की तांत्रिक चुकीमुळे हे घडले आणि त्यांनी आपली चूक सुधारली आहे. 

ट्विटरला सांगितले की लेह भारताचा अविभाज्य भाग

पत्रात अजय यांनी ट्विटरला आठवण करून दिली की लेह, केंद्र शासित प्रदेश लडाखचे मुख्यालय आहे. लडाख आणि जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य भाग असून कधीही वेगळे न होणारे भाग आहेत. या दोन्ही ठिकाणी भारतीय संविधानांतर्गत कारभार चालो. ट्विटरला इशारा देत म्हटले की या प्रकारच्या त्यांच्या कृत्यामुळे केवळ मायक्रो ब्लॉगिंग साईटप्रती लोकांचा सन्मान कमी होईल तसेच त्यांचा निष्पक्षपातीपणा आणि तटस्थतेवरही सवाल उठवले जातील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी