Chingari App: टिक टॉकचं देसी व्हर्जन, पाहा हे 'चिंगारी' अॅप आहे तरी काय! 

Chingari App: टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर आता याला पर्याय म्हणून अनेक अॅप समोर येत आहे. यापैकीच चिंगारी हे अॅप आता वेगाने लोकप्रिय होत आहे. जाणून घ्या या अॅपविषयी सारं काही. 

chingari_app
चिंगारी अॅप  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • भारत सरकारने टिक टॉक अ‍ॅपसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
  • टीक टॉकसारखंच चिंगारी हे भारतीय अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणार आहे
  • याआधी 'मित्रों' अ‍ॅपनेही बरीच लोकप्रियता मिळविली.

मुंबई: जेव्हापासून भारतात चिनी अ‍ॅप टिक टॉकबद्दल वाद निर्माण झाला होता तेव्हापासूनच या अॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत होती. याच दरम्यान, भारतात टिक टॉकसारखे भारतीय अॅप येऊ लागले होते. आता, केंद्र सरकारने भारतात टिक टॉक अ‍ॅपवर पूर्णपणे बंदी घातली आहे. (Tik-Tok Ban) 'मित्रों' या अ‍ॅप नंतर आता 'चिंगारी' हे अॅप  (Chingari App) वेगाने लोकप्रिय होत आहे. टिक टॉक एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करणारं सोशल मीडिया अॅप आहे. ज्यावर यूजर्स काही सेकंदांचे व्हिडिओ अपलोड करायचे आणि ज्याला लाखो-करोडो व्ह्यूज देखील मिळायचे.

या टिक टॉकच्या माध्यमातून अनेकांना भारतात लोकप्रियता मिळाली, अनेक जण हे सेलिब्रिटी बनले. याद्वारे लोक आपलं कौशल्य जगासमोर आणू लागले. पण आता याच धर्तीवर चिंगारी हे अॅप भारतात दाखल झालं आहे. याला टिक टॉकचं देसी व्हर्जन म्हटलं जात आहे. चिंगारी अॅपवर यूजर्स व्हिडिओ डाउनलोड करू शकतात, अपलोड करू शकतात, मित्रांशी चॅट करु शकतात, नवीन लोकांशी संवाद साधू शकतात, कंटेंट शेअर करू शकता आणि फीड्सद्वारे नवीनवीन गोष्टी ब्राउझ करू शकतात.

२५ लाखाहून अधिक डाउनलोड

गेल्या काही दिवसत चिंगारी हे अ‍ॅप दहा लाखाहूनही जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहे. अहवालानुसार, मागील १५ दिवसात हे अ‍ॅप बर्‍याच वेळा डाउनलोड केले गेले आहे. यावर, यूजर्स  व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, जीआयएफ स्टिकर्स आणि फोटो अपलोड करू शकतात. हे अ‍ॅप इंग्रजीसह १०  भाषांमध्ये Google Play Store वर उपलब्ध आहे.

हे अ‍ॅप हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाष सपोर्ट करतं. जेव्हापासून हे अॅप लाँच करण्यात आलं आहे तेव्हापासून या अॅपची लोकप्रियता वेगाने वाढली आहे. ऑनलाइन रिपोर्टनुसार हे अॅप बंगळुरुतील एक डेव्हलपर बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी तयार केले आहे. (chingari app is the desi version of tik tok see how to download and use)

कसं वापरायचं  हे APP? 
STEP 1
हे अॅप वापरण्यासाठी प्रथम आपल्याला Google Play Store वर जाऊन ते डाउनलोड करावे लागेल.
STEP 2
त्यानंतर आपला मोबाइल नंबर आणि नाव टाकून तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. 
STEP 3
येथून आपल्याला एक कोड मिळेल, तो टाकल्यानंतर आपण थेट अ‍ॅपच्या होम पेजवर जाल.
STEP 4
होम पेजवर आपल्याला टॉपला तीन पर्याय दिसतील. व्हिडिओ, ट्रेंडिंग आणि फीड्स. येथून आपण व्हिडिओवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता.
STEP 5
तसेच, आपण एखादा व्हिडिओ पोस्ट करू इच्छित असल्यास, नंतर आपण क्रिएट पोस्टवर क्लिक करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी