WhatsApp चा वापर वर्क फ्रॉम होमसाठी करत आहात? घ्या ही काळजी

सोशल सॅव्ही
Updated Mar 18, 2020 | 22:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

WhatsApp News: आपण सध्या वर्क फ्रॉम होम करत असाल आणि त्यादरम्यान व्हॉट्स अॅपचा वापर करत असाल तर आपण ही काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काय घडतंय असं?

whats app
WhatsApp चा वापर वर्क फ्रॉम होमसाठी करत आहात? घ्या ही काळजी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम करा
  • व्हॉट्स अॅपचा वापर करतांना घ्या विशेष काळजी
  • खाजगी आणि प्रोफेशनल व्हॉट्स अॅप ग्रुप ठेवा वेगळे, जाणून घ्या अधिक टिप्स

मुंबई: स्मार्टफोनचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती आता व्हॉट्स अॅपचा वापर करतात. विशेष करून जर आपण नोकरी करत असाल तर व्हॉट्स अॅप नक्की वापरतात. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या व्हॉट्स अॅप ग्रुपशी जोडलेला असतो. जगभरात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढलं तसा व्हॉट्स अॅपचा वापरही वाढलेला आहे. देशात अधिकाधिक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. जर आपण वर्क फ्रॉम होम करत असाल आणि ते करतांना व्हॉट्स अॅपचा वापर करात असाल तर काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

पर्सनल आणि प्रोफेशनल अकाऊंट –

खाजगी आणि प्रोफेशनल काम करण्यासाठी वेगवेगळा नंबर वापरा. अनेक अॅप असे आहेत जे पॅरलल स्पेसमध्ये आपल्याला व्हॉट्स अॅप एकाच फोनमध्ये दोन अकाऊंट्स वापरण्याची परवानगी देतात.

वेगवेगळे ग्रुप तयार करा –

सर्व कामांसाठी एकच ग्रुप तयार करू नये. ग्रुप्स लहानच ठेवणं चांगलं असतं. कुठल्याही खास कामावर लक्ष ठेवून गृप्स बनवावेत. उदाहरण म्हणजे प्रत्येक न्यूज चॅनेलमध्ये न्यूज रूमच्या बिट्सनुसार वेगवेगळे ग्रुप्स असले पाहिजे. संपूर्ण टीम एकाच ग्रुपमध्ये नसावी.

व्हॉट्स अॅप वेबचा वापर करावा –

आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी व्हॉट्स अॅप वेबचा वापर करावा. आपण एकतर मॅक किंवा विंडोज मशीन किंवा वेब व्हाट्स अॅप डॉट कॉम साठी व्हॉट्स अॅपचं वेब क्लायंट डाऊनलोड करू शकता.

ग्रुपमध्ये खासगी गोष्टी करू नये –

ग्रुपमध्ये बोलत असतांना पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीनं बोलावं. आपल्याला प्रत्येक लहान-सहान आणि खाजगी गोष्टी करण्याची गरज नाही. नाहीतर त्यामुळे दुसऱ्यांच्या कामातही अडथळा निर्माण होऊ शकतो.

ग्रुप व्हॉईस कॉल –

ग्रुप व्हॉईस कॉल करण्यासाठीही आपण व्हॉट्स अॅपचा वापर करू शकता. याचा वापर करणं सोपं आहे आणि आपण मॅन्युअली ग्रुपच्या सदस्यांची निवड व्हॉईस कॉलसाठी करू शकता.

वर्किंग अवरनंतर पिंग करू नये-

वर्क फ्रॉम होम करतांना दुसऱ्यांच्या वेळेचा आदर करा. वर्किंग अवर संपल्यानंतर वर्किंग ग्रुपमध्ये पिंग करू नये. अत्यावश्यक नसेल तर कुणालाही त्रास देणं टाळावं.

सिक्युरिटीला मजबूत ठेवावं –

आपण जर व्हॉट्स अॅप ग्रुपचा एक भाग असाल. तर आपला फोटो आणि इतर माहिती प्रायव्हेट ठेवावी. जेणेकरून आपण अशा सदस्यांना आपली खाजगी माहिती देण्यापासून टाळू शकता, ज्यांना तुम्ही ती देऊ इच्छित नसाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...