ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित

Elon Musk says Twitter is holding off relaunch of Blue Verified : ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित करत असल्याचे अॅलन मस्क यांनी ट्वीट करून जाहीर केले.

Elon Musk says Twitter is holding off relaunch of Blue Verified
ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित
  • अॅलन मस्क यांनी ट्वीट करून जाहीर केले
  • ट्विटरचे ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन दरमहा 8 डॉलर मोजून मिळणार होते

Elon Musk says Twitter is holding off relaunch of Blue Verified : ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित करत असल्याचे अॅलन मस्क यांनी ट्वीट करून जाहीर केले. ट्विटर कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस सुरू करत असल्याची घोषणा केली होती. या सर्व्हिस अंतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या दरांमध्ये ट्विटरचे ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन उपलब्ध होणार होते. अमेरिका, कॅनडामध्ये ट्विटरचे ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन दरमहा 8 डॉलर मोजून मिळणार होते. पण आता पेड सर्व्हिस स्थगित करण्यात आली आहे.

ट्विटर फेक अकाउंट शोधून ती बंदी करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. यामुळे ट्विटरने पेड ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन सर्व्हिस स्थगित केली आहे. आधी पेड ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन सर्व्हिस 29 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार होती.

How to reduce data usages: मोबाईल डेटा पटकन संपतो? वापरा या सोप्या टिप्स

एका स्मार्टफोनवर वापरा दोन Whatsapp

YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा

ट्विटरमध्ये सुरू असलेली कर्मचारी कपातीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अॅलन मस्क यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच ट्विटरने अधिकारी आणि कर्मचारी यांचे वर्क फ्रॉम होम कायमचे बंद केले. कामाचे तास वाढवित असल्याची घोषणा केली. या दोन घोषणा आजही कायम आहेत.

ट्विटर वापरणाऱ्या व्यक्ती आणि संघटना अशी विभागणी करून दोन्ही गटांना व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळ्या रंगाच्या टीक वापरण्याचा विचार सुरू आहे, असेही सूतोवाच अॅलन मस्क यांनी केले.

ट्विटरच्या व्हेरिफाइड युझरने त्याच्या हँडलच्या नावात अथवा अकाउंटच्या माहितीत बदल केला तर त्याला मिळालेली ब्ल्यू टीक काढून घेतली जाईल, असेही ट्विटरकडून जाहीर करण्यात आले आहे. ट्विटरच्या युझरना ट्विटर कंपनीच्या अटी-शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे बंधन आहे.

नव्या नियमांमुळे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पण लवकरच परिस्थिती नियंत्रणात असेल, असा विश्वास ट्विटर या कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी