Facebook आणतयं नवं डेटिग अॅप, मिळेल तुमचा आवडीचा साथी

सोशल मीडिया कंपनी फेसबूक आता तुमचं प्रेम मिळवून देण्यात मदत करणार आहे. फेसबूक एक नवीन डेटिंग अॅप आणणार आहे. फेसबूक Sparked नावाचं डेटिंग अॅप लॉन्च करणार आहे.

Facebook brings new dating app get your favorite partner
Facebook आणतयं नवं डेटिग अॅप  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • व्हिडिओ तयार करुन निवडा आपला पार्टनर
  • फेसबूकचं नवीन डेटिग अॅप
  • अमेरिकेतही फेसबूकने आणलं होतं फेसबूक डेटिग अॅप

नवी दिल्ली  : सोशल मीडिया (Social Media) कंपनी फेसबूक आता तुमचं प्रेम मिळवून देण्यात मदत करणार आहे. फेसबूक(Facebook) एक नवीन डेटिंग अॅप (Dating App)आणणार आहे. फेसबूक Sparked  नावाचं डेटिंग अॅप लॉन्च करणार आहे. हे अॅपचं एक्सेस घेणं आव्हानात्मक असणार आहे. या अॅपच्या एक्सेससाठी आपल्याला थोडी मेहनतं करावी लागणार आहे. खुद फेसबूकने दावा केला आहे की, हे अॅप इतर डेटिंग APP पेक्षा वेगळं असेल. (Facebook brings new dating app get your favorite partner)

APP मध्ये प्रवेश करणं आहे अवघड 

अहवालानुसार, फेसबूकने आपल्या या डेटिंग अॅपचं नाव Sparked ठेवण्यात आले आहे. या अॅपमध्ये युझर्सद्वारे बनविण्यात आलेला व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हा व्हिडिओ चार मिनिटांचा राहणार असून हा व्हिडिओ दुसऱ्या युझर्ससोबत शेअर करू शकतात. जर कोणत्या युझरला आवडला तर तुम्हाला डेटिंगची संधी मिळणार आहे.  

आधी तुमच्या व्हिडिओची होणार चौकशी 

फेसबूकच्या या डेटिंग अॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी एक चार मिनिटांचा व्हिडिओ बनवावा लागेल. यात तुम्हाला तुमच्या विषयीची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय तुम्हाला सांगावे लागेल की, तुम्ही कोणाला डेटिंगवर घेऊन जाण्यास इच्छुक आहात. तुमच्याकडे पुरुष (Male), महिला (Female), तृतीयपंथी (Transgender) असे पर्याय असणार आहेत.  व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर फेसबूकची टीम त्याची चौकशी करेल त्यानंतरच तुम्हाला डेटिंग अॅपमध्ये प्रवेश मिळेल. 

असं असेल अॅपचं काम

माहितीनुसार, या डेटिग अॅपला फक्त एक दुसऱ्यांना भेटण्यासाठी वारता येणार आहे. एकदा मॅचिंग झाल्यानंतर फेसबूक दोन्ही यूझर्सला इंस्टाग्राम (Instagram), इमेसेज (iMessage) किंवा ईमेल(Email) च्या माध्यमातून एक दुसऱ्याच्या संपर्कात राहता येईल. दरम्यान काही दिवसांआधी फेसबूकने अमेरिका आणि युरोपमध्ये एक खास डेटिग अॅप लॉन्च केले होते. याच नाव फेसबूक डेटिग  Facebook Dating आहे. हे अॅप Tinder, Bumble आणि OkCupid चा टक्कर देण्यासाठी लॉन्च केले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी