Messenger आणि Instagram साठी फेसबुकने आणलं नवं फीचर

Facebook Vanish Mode: इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसाठी एक खास फीचर फेसबुक घेऊन आलं आहे. या नवीन फीचरद्वारे आपोआप चॅटमधील मेसेज डिलीट होणार आहे. 

Facebook
Messenger आणि Instagram साठी फेसबुकने आणलं नवं फीचर  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • फेसबुकने आणले नव्हे फीचर
  • नवं फीचर मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर रोलआऊट होणार
  • व्हॅनिश मोड नावाचं नवं फीचर भारतात लाँच होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही

मुंबई: सोशल मीडिया कंपनी फेसबुकने (Facebook) मेसेंजर (Messenger) आणि इंस्टाग्रामसाठी (Instagram) व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर (Feature)आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले आहे आणि लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. तथापि, हे फीचर भारतात यूजर्ससाठी उपलब्ध असेल की नाही, याची फेसबुकने अद्याप माहिती दिलेली नाही. नवीन फीचरद्वारे, यूजर त्यांचे मेसेज आपोआप डिलीट करु शकतील. व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होईल.

कसे असेल व्हॅनिश मोड फीचर?

यूजर्संना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून नवा ऑप्शन इनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा ऑप्शन डिसेबल देखील करु शकेल. फेसबुक मेसेंजरवर आधीपासूनच एक सीक्रेट कन्वर्सेशन फीचर देण्यात आलेलं आहे. ज्याच्या मदततीने यूजर्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड चॅट करु शकतात. यावेळी सीक्रेट चॅटवेळी ज्या काही फाईल्स असतील त्या फेसबुक सर्व्हरवर नव्हे तर यूजर्सच्या फोनमध्ये स्टोर होतील. तथापि, फेसबुकचे नवीन फीचर वॅनिश मोड प्रमाणेच, मेसेज वाचल्यानंतर अॅप बंद केल्यावर ते स्वयंचलितपणे हटविले किंवा अदृश्य होत नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकचे नवीन फीचर व्हॅनिश मोड केवळ वैयक्तिक चॅट्सवरच काम करेल. हे फीचर ग्रुप चॅटसाठी नसेल. फेसबुकने अलीकडेच आपल्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक सेल्फ डिलीटिंग फीचर लॉन्च केले आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर जेव्हा मेसेज रिसीव्हर पाहिल तेव्हा तो आपोआपच डिलीट होईल. मेसेज डिलीट होणारं फीचर आधी स्नॅपचॅटमध्ये असायचे पण आता हे सर्व प्लॅटफॉर्मवर म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामवर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी