Facebook Down : मुंबई : जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुम्हाला काही विचित्र गोष्टी जाणवत असतील. जर तुम्ही न्युजफीड पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरतात फेसबुकवर नेटकर्यांना विचित्र गोष्टी जाणवत आहेत. काही लोकांची टाईमलाईन न्युज फीड अशा विचित्र गोष्टींनी भरले आहे. (facebook down user posted memes on twitter and trends facebook down)
Is someone getting fired?? #Facebook #facebookdown #facebookhacked pic.twitter.com/ZKCvThi3BV — iSkarlet (@justmiiLeah) August 24, 2022
फेसबुकवर काही सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक झाले आहेत असे सांगितले जात आहे. तर काहींच्या टाईमलाईनवर इतरांचे पोस्टिंग दिसत आहे. जगभरात हा प्रॉब्लेम दिसत आहे. हा प्रॉब्लेम प्रत्येकाला येत असल्याने नेटकर्यांनी ट्विटरवर धाव घेतली आहे आणि फेसबुकवर काय दिसत आहे याची माहिती दिली आहे.
I'll just leave this here. Good job #facebookhacked pic.twitter.com/pkIaOs2OzE — Tommarhawk (@Tommarhawk) August 24, 2022
फेसबुकवर नमकी काय अडचण आहे याबद्दल मेटा कंपनीने कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. फेसबुक युजर्संना स्क्रोल करताना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरूवातीला हा हॅकिंगचा प्रकार नाही असे समजत आहे. फेसबुकरवरील हा प्रॉब्लेम म्हणजे ग्लिच किंवा मालफंक्शनिंग आहे असे सांगितले जात आहे. Downdetector या सोशल साईटवरही फेसबुक वापरताना अडचणी येत असल्याचे युजर्संनी म्हटले आहे. फेसबुक फीडवर असे का दिसत आहे यावर कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. मालफंक्शनमुळे ही अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरासह भारतातही दुपारी १३ वाजल्यापासून ही अडचण येत आहे. युजर ज्या पेजला फॉलो करत आहेत त्यावर अशा टाईमलाईनवर पोस्ट केलेल्या पोस्ट दिसत आहे. लोकांनी ट्विटरवर जाऊन याबद्द्ल मीम्सही शेअर केले आहेत.
Facebook hacked or something? My timeline is filled with people posting on celebrity walls. #Facebook #MarkZuckerberg@facebook @MetaNewsroom #facebookdown #FacebookHacked pic.twitter.com/91f109JoP9 — k sar (@ksarvottam621) August 24, 2022
काही युजर्संनी फेसबुक हॅक झाल्याचे म्हटएल आहे. तसेच काही जणांनी ग्लिच असल्यामुळे ही अडचण येत असल्याचे सांगितले आहे. कंपनी लवकरच ही अडचण दूर करएल परंतु काही लोक यातही आपला फायदा करून घेत आहेत. लोक पेमेंटच्या लिंक्स पोस्ट करत आहेत तर काही लोक क्रिप्टोअकरन्सीचे प्रोजेक्टची जाहिरात करत आहेत.
अधिक वाचा : Maruti Car update : मारुतीच्या वाहनांना प्रचंड मागणी, 3.87 लाख वाहनांची ऑर्डर प्रतिक्षेत