फेसबुकची मोठी घोषणा; लवकरच बंद हे तंत्रज्ञान होणार; 1 अब्जाहून अधिक लोकांना होणार लाभ

Facebook's big announcement फेसबुकवरील (Facebook) ग्रुप फोटो काढून पोस्ट केल्यानंतर आता तो ग्रुप फोटो किंवा इतर व्यक्तीसोबत घेतलेला फोटो आता त्या व्यक्तीला टॅग होणार नाही.

Facebook
फेसबुक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • फेसबुक फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी बंद करणार.
  • आपली प्रतिमा सुधारण्यासाठी फेसबुकने घेतला हा निर्णय
  • या तंत्रज्ञानामुळे फेसबुकवर Federal Trade Commission ने वर्ष 2019 में 500 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता.

Facebook's big announcement : नवी दिल्ली: फेसबुकवरील (Facebook) ग्रुप फोटो काढून पोस्ट केल्यानंतर आता तो ग्रुप फोटो किंवा इतर व्यक्तीसोबत घेतलेला फोटो आता त्या व्यक्तीला टॅग होणार नाही. आपण जेव्हाही कधी एखाद्या व्यक्तीसोबत फोटो घेतला की फेसबुक त्या फोटोला Auto Tag करत पण आता फेसबुकच्या नवीन नियमामुळे Auto Tag केलं जाणार नाही. फेसबुकने याची अधिकृत  घोषणा केली आहे. दरम्यान आपल्या स्वार्थासाठी फेसबुक यूजर्सच्या वैयक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले आहे की, ते (फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी) चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. यामुळे एक अब्जाहून अधिक लोकांच्या चेहऱ्याचे ठसे मिटवले जाणार आहेत. 

जेव्हाही तुम्ही Facebook वर दुसर्‍या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड करता तेव्हा Facebook त्या फोटोतील व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करत असायचा. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या (Face Detection Technology) मदतीने करत असे.  
खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे चेहरे त्याच्या सर्व्हरवर संग्रहित करते आणि याचा वापर करून, फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने, ते वापरकर्त्याच्या फोटोमध्ये उपस्थित लोकांचे चेहरे शोधून त्यांना टॅग करते. मात्र या तंत्रज्ञानावर काही काळापासून गोपनीयतेच्या उल्लंघन होत  असल्याचे वाद होत असायचे. त्यामुळे फेसबुकने येत्या आठवडाभरात ते बंद करण्याची घोषणा केली आहे.
एवढेच नाही तर फेसबुकने आपल्या सर्व्हरवरील शेकडो कोटी चेहरे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बर्याच काळापासून वादात होते. कारण यासाठी फेसबुक त्याच्या सर्व्हरवर लाखो चेहरे संग्रहित करत असे आणि बरेच लोक हे फेसबुक वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर हल्ला करत असल्याचे मानत. या तंत्रज्ञानामुळे फेसबुकवर Federal Trade Commission ने वर्ष 2019 में 500 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता. तर Face Detection Technology मुळे मागील वर्षी फेसबुकला 65 कोटी डॉलर रुपये तक्रारकर्त्यांना द्यावे लागले होते. अमेरिका इलिनोइस राज्यात फेसबुकने 'फेस ज्योमेट्री' सहित लोकांची बायोमेट्रिक माहितीचा उपयोग केला होता. या प्रकरणी तक्रारकर्त्यांना फेसबुकने पैसे दिले होते. 

फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत कागदपत्रे लीक केली, त्यानंतर फेसबुकचा मोठा विरोध होई लागला होता. कंपनी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. ही चूक सुधारण्यासाठी त्याने आपल्या व्यवसायाचे नावही बदलले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी