आपणही ऑनलाईन प्रेमाच्या शोधात आहात का? डेटिंग अॅप्सनी लसीकरणाच्या निकषाची टाकली भर

डेटिंग अॅप्सना सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात आधी कधीही नव्हते इतके महत्व आले आहे. कोरोनाच्या काळातच असे नाही, तर त्याआधीही ऑनलाईन डेटिंगसाठी यांचा वापर होत असे. आता त्यांनी लसीकरणाला स्थान दिले आहे.

Online dating apps
आपणही ऑनलाईन प्रेमाच्या शोधात आहात का? डेटिंग अॅप्सनी अॅपमध्ये लसीकरणाच्या निकषाची टाकली भर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लोकांनी स्वतःच दिली लसीकरणाबाबत माहिती
  • इलेट डेट या अॅपने आणला लसीकरणाचा निकष
  • अॅप्सनी उपलब्ध करून दिली व्हिडिओ डेटिंगची सुविधा

डेटिंग अॅप्सना (Dating apps) सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात (technology era) आधी कधीही नव्हते इतके महत्व (significance) आले आहे. कोरोनाच्या काळातच (corona period) असे नाही, तर त्याआधीही जगभरातील लोकांशी संपर्क (contact) साधण्यासाठी आणि त्यांच्याशी ऑनलाईन डेटिंग (online dating) करून आपल्या प्रेमाचा (love) शोध घेण्यासाठी यांचा वापर (use) होत असे. मात्र कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता या डेटिंग अॅप्सनी एक अतिशय महत्वाचा निकष (important criterion) आपल्या अॅप्सवर आणला आहे.

लोकांनी स्वतःच दिली लसीकरणाबाबत माहिती

टिंडर, बंबल, ओके क्यूपिड अशा लोकप्रिय डेटिंग अॅप्सकडून एकत्रित केलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की या अॅप्सचा वापर करणाऱ्या अनेकांनी त्यांनी लसीच्या मात्रा घेतल्याचा उल्लेखही त्यांच्या माहितीत केला आहे तसेच त्यांच्या भविष्यातील जोडीदारानेही लस घेतलेली असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोनावर मात करण्याचा लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे बोलले जात असताना हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.

इलेट डेट या अॅपने आणला लसीकरणाचा निकष

द गार्डियनच्या बातमीनुसार इलेट डेट नावाच्या एका डेटिंग अॅपने आपल्या अॅपमध्ये लसीकरणाची परिस्थिती असा निकष आणला आहे जेणेकरून याचीही चाळणी आपल्यासाठी जोडीदार शोधताना लोकांना लावता येईल. लोकांनी आपल्या माहितीत लसीकरण, डोस असे शब्द वापरून त्याच्या आधारे लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर ज्यांनी डोस घेतलेली नाही अशा लोकांना थेट नकार दिला. हे सर्व पाहता या अॅपशी संबंधित लोकांनी हा निर्णय घेतला. संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या अॅपवर लसीची डोस घेणे ही सर्वात लोकप्रिय गोष्ट आहे आणि लस घेतलेल्यांना लस न घेतलेल्यांच्या तुलनेत जास्त लाईक्स मिळत आहेत.

अॅप्सनी उपलब्ध करून दिली व्हिडिओ डेटिंगची सुविधा

या डेटिंग अॅप्ससाठी आपल्या वापरकर्त्यांची सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आवडण्यासाठी तिचे लसीकरण झालेले असणे याला महत्व यावे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही. अशा काही अॅप्सनी व्हिडिओ डेटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून सुरक्षित पद्धतीने लोकांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी