Alert : आपल्याकडे 'ही' Google Chrome एक्स्टेंशन असतील तर डीलीट करा

Five malicious Google Chrome extensions are stealing your data delete them : पर्सनल डेटा चोरणारी धोकादायक गूगल एक्स्टेंशन आपल्या ब्राउझरला जोडली असल्यास लगेच डीलीट करावी.

Five malicious Google Chrome extensions are stealing your data delete them
Alert : आपल्याकडे 'ही' Google Chrome एक्स्टेंशन असतील तर डीलीट करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Alert : आपल्याकडे 'ही' Google Chrome एक्स्टेंशन असतील तर डीलीट करा
  • पर्सनल डेटा चोरणारी धोकादायक गूगल एक्स्टेंशन
  • मॅकॅफी कंपनीने दिली धोक्याची सूचना

Five malicious Google Chrome extensions are stealing your data delete them : मोबाइल आणि कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर गूगल क्रोम ब्राउझरद्वारे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. हे युझर अनेकदा ब्राउझिंग करणे वेगवान आणि सोपे करण्यासाठी विविध एक्स्टेंशन वापरतात. यातील निवडक एक्स्टेंशन अतिशय धोकादायक असल्याचे आढळले. ही एक्स्टेंशन युझरच्या नकळत त्याचा पर्सनल डेटा वापरतात. युझरचा पर्सनल डेटा चोरणारी ही एक्स्टेंशन आपले नुकसान करू शकतात. यामुळे ही एक्स्टेंशन आपल्या ब्राउझरला जोडली असल्यास लगेच डीलीट करावी. । टेक इट EASY

सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या मॅकॅफी कंपनीने ही धोक्याची सूचना दिली आहे. पर्सनल डेटा चोरणारी धोकादायक गूगल एक्स्टेंशन आपल्या ब्राउझरला जोडली असल्यास लगेच डीलीट करावी. अनेकदा ही एक्स्टेंशन एखादा ओटीटी प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी अथवा वेबसाइट कूपन घ्यायला वा एखाद्या वेबसाइटचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरली जातात. पर्सनल डेटा चोरणारी धोकादायक गूगल एक्स्टेंशन १४ लाखांपेक्षा जास्त युझरनी डाऊनलोड केली आहेत. पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक्स्टेंशन आपल्या मशीनमधून डीलीट करणे तसेच ही एक्स्टेंशन पुन्हा न वापरणे हेच हिताचे आहे. 

धोकादायक आणि पर्सनल डेटा चोरणारी गूगल क्रोम ब्राउझरची एक्स्टेंशन 

  1. Netflix Party - आठ लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड
  2. Netflix Party 2 - तीन लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड
  3. FlipShope - ८० हजारांपेक्षा जास्त डाऊनलोड
  4. Full Page Screenshot Capture - २ लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड
  5. AutoBuy Flash Sales -  २० हजारांपेक्षा जास्त डाऊनलोड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी