TV, Mobile,फ्रिजपासून अनेक वस्तूंवर बंपर सवलत, पाहा Flipkart चा भन्नाट सेल 

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्टने आजपासून ‘बिग दिवाळी सेल’सुरु केला आहे. ज्यामध्ये अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट मिळणार आहे. 

TV, Mobile,फ्रिजपासून अनेक वस्तूंवर बंपर सवलत, पाहा Flipkart चा भन्नाट सेल 
Flipkart sale  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • Flipkart Big Diwali Sale 2020 सेलची आजपासून सुरुवात
  • फ्लिपकार्टच्या नव्या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर मिळणार भरघोस सूट
  • टीव्ही आणि स्मार्टफोनवर सूट मिळणार

मुंबई: आता सणासुदीचा दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे अनेक जण आवर्जून खरेदी करतात. यामुळेच आता  फ्लिपकार्टने दिवाळीपूर्वी बिग दिवाळी सेल २०२० (Flipkart Big Diwali Sale 2020) सुरु केला आहे. जो २९ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये मोठी प्रमाणात डिस्काउंट देण्यात आलं आहे. ज्यामुळे ग्राहकांची खूप बचत होणार आहे.

मागील सेलप्रमाणेच या नव्या सेलमध्येही कंपनी स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, टीव्ही, रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन, फॅशन प्रोडक्ट आणि स्वयंपाकघरातील उपकरणे, तसेच इतर प्रोडक्टवर भारी सूट देण्यात आली आहे. यासोबतच काही बँकेच्या ऑफर्ससह देखील मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. 

या सेलची सुरुवात आजपासून (२९ ऑक्टोबर) सुरू होत आहे. परंतु प्लस ग्राहकांसाठी हा सेल २८ ऑक्टोबरपासूनच  सुरू झाला आहे. पेमेंट ऑफर व्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे इतर अनेक ऑफरदेखील देत आहेत. ज्यात प्रोडक्ट एक्सचेंज, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि निवडक उत्पादनांवर अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे.

टीव्ही आणि इतर उपकरणांमध्ये मोठी सूट 

या सेलमध्ये टीव्ही, फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीन सारख्या उपकरणांवर कंपनी 80% पर्यंत सूट देणार आहे.  फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये ३२ इंचीचा स्मार्ट टीव्ही ९ ते १० हजार रुपयात उपलब्ध होईल तर आणि डबल डोर रेफ्रिजरेटर देखील १५ ते १६ हजारांच्या श्रेणीपासून सुरु होईल. तसंच वॉशिंग मशीन आणि इतर उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनवर मिळणार मोठी सूट 

Flipkart Big Diwali सेलमध्ये सॅमसंग, शाओमी, ओप्पो, विवो यासह इतर कंपन्यांचे फोन मोठ्या सवलतीत उपलब्ध असतील. Oppo A52, Redmi Note 8 आणि Infinix Smart 4 Plus यांचा देखील समावेश आहे. याशिवाय iPhone,Samsung, Redmi, Vivo या स्मार्टफोन कंपनी देखील अनेक मॉडेल्सवर सूट देत आहे. स्मार्टफोनशिवाय या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवरही चांगल्या ऑफर असणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी