Flipkart Dussehra Special sale सुरु, स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टवर बंपर सूट

ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलच्या शेवटी दसरा स्पेशल सेल सुरू केला आहे. स्मार्टफोनसह अनेक उत्पादनांना भारी सूट मिळत आहे.

Flipkart Dussehra Special sale
Flipkart Dussehra Special sale सुरु, स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टवर बंपर सूट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बिग बिलियन डेज सेल २१ ऑक्टोबर रोजी संपणार 
  • फ्लिपकार्टने २२ ऑक्टोबरपासून दसरा विशेष केला सेल सुरु 
  • अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपूर्ण महिनाभर सुरु असेल

मुंबई: Flipkart Dussehra Specials sale: बिग बिलियन डेजची हा सेल संपल्यानंतर फ्लिपकार्टने आता आपला दसरा स्पेशल सेलची घोषणा केली आहे. हा नवीन सेल आजपासून सुरू झाला आहे आणि २८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. अ‍ॅमेझॉनने जाहीर केले होते की त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा संपूर्ण महिनाभर असणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन फ्लिपकार्टने कदाचित बॅक-टू-बॅक सेलची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्ट स्मार्टफोनमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय, एक्सचेंज डिस्काउंट आणि मोबाइल सिक्युरिटीसह जबरदस्त डील देत आहे. यावेळी फ्लिपकार्टने कोटक महिंद्रा आणि एचएसबीसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. रियलमी सी 3, आयफोन एसई (2020), आयफोन 11 प्रो आणि रेडमी 8 ए ड्युअल यासारख्या फोनच्या किंमतीत कपात करुन विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.

फ्लिपकार्ट आयफोन 11 प्रो  64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट हा फोन ग्राहकांना दसरा सेलमध्ये देखील ७९,९९९ रुपयांनाच मिळणार आहे. आयफोन 11 प्रोची किंमत ही १,०६,६०० रुपये आहे. त्यामुळे आता या सेलमध्ये आयफोन ११ प्रोवर तब्बल २६,६०१ रुपयांची सूट आहे. यामध्ये नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. आयफोन एसई (2020) वर ७५०१ रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन ३४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

रिअलमी सी3 फ्लिपकार्टवर १००० रुपयांची सूट मिळत आहे. दसरा स्पेशल सेलमध्ये Poco M2 वर १००० रुपयांची सूट मिळत आहे. रिअॅलिटी नारजो 20 प्रोवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. रेडमी 8A वर 500 रुपयांची सूट आहे. दसरा स्पेशल सेलमध्ये फ्लिपकार्ट अनेक उत्पादनांवर भारी सूट देत आहे.तसेच या सेलमुळे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. ज्यामुळे कोरोना काळात त्यांना घरातूनच सुरक्षितपणे आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्टने Flipkart Big Billion Days Sale 2020 १६ ऑक्टोबरपासून सुरू केला होता. हा मेगा सेल २१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये जबरदस्त ऑफर होत्या. १६ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या सेलमध्ये यूजर्संना त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये त्वरित कॅशबॅक देखील देण्यात आलं होतं..

या सणासुदीच्या हंगामात या सेलमध्ये देशभरातील लाखो पेटीएम यूजर्स फ्लिपकार्टवर त्यांच्या वॉलेट्स आणि यूपीआयचा वापर केला.. फक्त एका क्लिकवर ग्राहक Flipkart Big Billion Days दरम्यान उत्तम दरात वस्तू प्राप्त झाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी