अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवत 2022मध्ये येणार दोन वेगवेगळ्या वर्णांचे हात हस्तांदोलन करत असलेली इमोजी

सोशल सॅव्ही
Updated May 02, 2021 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

या नव्या ट्रेंडचे अनुकरण करून गूगल, सॅमसंग, फेसबुक आणि इतर कंपन्याही अशा नव्या इमोजी यावर्षी आणण्याची शक्यता आहे. या सर्व इमोजींपैकी वेगवेगळ्या रंगाचे हात हस्तांदोलन करताना दाखवणारी इमोजी चर्चेत आहे.

Image Credit: Google Blog
व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या संवाद मंचांवर उपलब्ध होणार इमोजी 

थोडं पण कामाचं

  • अॅपलने एकाच ओ. एस. अपडेटमध्ये आणल्या 441 नव्या इमोजी
  • वेगवेगळ्या रंगाचे हात हस्तांदोलन करत असलेली इमोजी चर्चेत
  • व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या संवाद मंचांवर उपलब्ध होणार इमोजी

अॅपलने (Apple) नुकतेच आपले आयफोन्ससाठीचे (iPhone) iOS 14.5चे नवे अपडेट (update) लॉन्च (launch) केले आहे आणि यासोबतच त्यांनी आपल्या भावना (feelings) दाखवण्यात मदत करणाऱ्या नव्या इमोजीही (new emojis) आणल्या आहेत. या इमोजींची संख्या तब्बल 441 इतकी आहे. या नव्या ट्रेंडचे (new trend) अनुकरण (follow) करून गूगल (Google), सॅमसंग (Samsung), फेसबुक (Facebook) आणि इतर कंपन्याही (other companies) अशा नव्या इमोजी यावर्षी आणण्याची शक्यता आहे. या सर्व इमोजींपैकी वेगवेगळ्या रंगाचे (different skin tones) हात (hands) हस्तांदोलन (handshake) करताना दाखवणारी इमोजी चर्चेत (discussions) आहे.

वेगवेगळ्या वर्णाचे हात आता करणार हस्तांदोलन

हस्तांदोलन करणाऱ्या इमोजी या आजही व्हॉट्सअॅप, फेसबुक, अॅपल आणि इतर मंचांवरही उपलब्ध आहेत. यात पिवळ्या रंगाच्या हातांचा पर्यायही उपलब्ध आहे आणि नव्या वर्णांच्या हस्तांदोलन करणाऱ्या हातांची इमोजी ही युनिकोड कॉन्सोर्टियमकडे देण्यात आले आहेत. यानंतर आता हस्तांदोलन करणारे दोन्ही हात वेगवेगळ्या वर्णाचे असणार आहेत.

हस्तांदोलन करणाऱ्या 25 नव्या हातांच्या जोड्या

गूगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की गूगलच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर फॉर इमोजी आणि युनिकोड टेक्निकल कमिटीच्या सदस्य जेनिफर डॅनिएल यांनी हस्तांदोलन करणाऱ्या हातांच्या जोड्यांसाठी 25 नव्या प्रकारांची कल्पना मांडली होती ज्या हातांचे वर्ण वेगवेगळे असतील.

हस्तांदोलनांच्या इमोजीची दीर्घ आणि किचकट प्रक्रिया

त्यांनी असेही सांगितले की ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालणारी आहे. यात फक्त हातांचा रंग बदलण्याचा पर्याय उपलब्ध नसेल, तर या इमोजीतले दोन्ही हात हे वेगवेगळ्या वर्णाचे असतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी