डिसेंबरपासून तुमच्या फेसबूकमधील प्रोफाइलमध्ये होणार मोठे बदल, नाही दिसणार तुमचा इंटरेस्ट

एक डिसेंबरनंतर तुम्हाला फेसबुक प्रोफाइल Facebook Profile वर इंटरेस्टेड इन, रिलिजियस व्ह्यू, अॅड्रेस, आणि पॉलिटिकल व्ह्यूज आदी गोष्टी दिसणार नाहीत. ही सर्व आवश्यक माहिती सध्या तुमच्या प्रोफाइल सेक्शन आणि बायोत दिसत आहेत. दरम्यान फेसबुकमध्ये होणाऱ्या या सर्वात मोठ्या बदलाला सर्वात आधी Matt Navarra (सोशल मीडिया कंसल्टेंट) ने स्पॉट केले आहे.

From December, there will be big changes in your Facebook profile
डिसेंबरपासून तुमच्या फेसबूकमधील प्रोफाइलमध्ये होणार मोठे बदल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फेसबुकमध्ये होणाऱ्या या सर्वात मोठ्या बदलाला सर्वात आधी Matt Navarra (सोशल मीडिया कंसल्टेंट) ने स्पॉट केले आहे.
  • 1 डिसेंबर 2022 पासून फेसबुक यूजरच्या प्रोफाइल मधून रिलिजियस व्ह्यू आणि इंटरेस्टेड इन दिसणार नाही
  • मेटाच्या प्रवक्त्या camille vasquez ने म्हटले की, फेसबुकने नेविगेट करणे सोपे होत आहे. या

नवी दिल्लीः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook लवकरच मोठे बदल करणार आहे. कंपनी आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधील (profile) काही गोष्टी हटवणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर मोठा बदल करणार आहे. फेसबुकच्या या बदलानंतर तुमच्या प्रोफाइलवरील काही गोष्टी गायब होणार आहेत.  (From December, there will be big changes in your Facebook profile)

या गोष्टी दिसणार नाहीत
 

एक डिसेंबरनंतर तुम्हाला फेसबुक प्रोफाइल Facebook Profile वर इंटरेस्टेड इन, रिलिजियस व्ह्यू, अॅड्रेस, आणि पॉलिटिकल व्ह्यूज आदी गोष्टी दिसणार नाहीत. ही सर्व आवश्यक माहिती सध्या तुमच्या प्रोफाइल सेक्शन आणि बायोत दिसत आहेत. दरम्यान फेसबुकमध्ये होणाऱ्या या सर्वात मोठ्या बदलाला सर्वात आधी Matt Navarra (सोशल मीडिया कंसल्टेंट) ने स्पॉट केले आहे. केवळ स्पॉट केले नाही तर त्यांनी ट्विट करून सर्व या बदलाची माहिती सांगितली आहे. त्यांनी याचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. ट्विटरमध्ये लिहिले की, 1 डिसेंबर 2022 पासून फेसबुक यूजरच्या प्रोफाइल मधून रिलिजियस व्ह्यू आणि इंटरेस्टेड इन सारख्या गोष्टी हटवण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  : 'दृश्यम 2' पायरसी साइटवर लीक

सध्या कंपनीकडून या बदलासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. फेसबुकमध्ये आधीपासून लोकांची पसंत, त्यांचे रिलिजियस व्ह्यूज, इंटरेस्टेड इन आणि राजकीय विचार संबंधी एक संपूर्ण कॉलम होता. लोक आधी फेसबुकवर आपली प्रोफाइल बनवत होते. त्यावेळी त्यांना फॉर्म भरण्यास तास लागत होता.  मेटाच्या प्रवक्त्या camille vasquez ने म्हटले की, फेसबुकने नेविगेट करणे सोपे होत आहे. यासाठी लोकांना आम्ही नोटिफिकेशन पाठवणे सुरू केले आहे. दरम्यान,  Metaकंपनी गेल्या काही दिवसांपासून तोट्यात सुरू आहे. त्यामुळेच कंपनीने जवळपास 11हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 73 टक्क्यांनी खाली  घसरले आहेत.

अधिक वाचा  : राहुल गांधींच्या जाहीर सभेत मनसे दाखवणार काळे झेंडे

कंपनीचे  2016 मधील आपले न्यूनतम  स्तरापेक्षा खाली पोहचले आहेत.  500 इंडेक्सच्या सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या शेअर्सच्या सुचीत सहभागी झाले आहे. मेटाच्या शेअर्सचे मूल्य यावर्षी सुमारे $ 67 अब्जांनी खाली आले आहे, जे कंपनीसाठी एखाद्या धक्क्या सारखे आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी