आनंदची बातमी! भारतात परत होणार टिक-टॉकचा आवाज, दोन वर्षानंतर TikTok देशात परतीच्या तयारीत

दिल्ली ते गल्लीपर्यंत TikTok ने लोकांना आपल्या रिल्स व्हिडिओनं वेड लावलं होतं. प्रत्येकजण आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवून प्रकाशझोतात येत होता. परंतु केंद्रा सरकारच्या निर्णयामुळे आपाला बाशा गुंडाळून परत चीनमध्ये गेलेलं टिकटॉक परत एकदा भारतात (TikTok Relaunch) परत येण्याच्या तयारीत आहे.

 TikTok prepares to return to the country after two years
दोन वर्षानंतर TikTok देशात परतीच्या तयारीत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गेल्या दोन वर्षांपासून देशात TikTok बॅन आहे.
  • भारतात परतण्यासाठी हिरानंदानी ग्रुपसोबत चर्चा.
  • TiKTok वर बंदी घातल्यानंतर फेसबुकच्या मालकीच्या इंस्टाग्राम रील फीचरने TikTok ची जागा घेतली.

TikTok Relaunch  : नवी दिल्ली:  दिल्ली ते गल्लीपर्यंत TikTok ने लोकांना आपल्या रिल्स व्हिडिओनं वेड लावलं होतं. प्रत्येकजण आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवून प्रकाशझोतात येत होता. परंतु केंद्रा सरकारच्या निर्णयामुळे आपाला बाशा गुंडाळून परत चीनमध्ये गेलेलं टिकटॉक परत एकदा भारतात (TikTok Relaunch) परत येण्याच्या तयारीत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून भारतात बॅन असलेल्या TikTok ने तरुणाईला प्रचंड वेड लावलं होतं. खूप वेळ लोक त्यात गुंतलेले राहत होते. TikTok ने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. अनेकांनी या माध्यमातून पैसे देखील कमावले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशात TikTok बॅन आहे, यामुळे अनेक TikTok स्टार्सचा हिरमोड झाला आहे. 

सरकारने 2020 मध्ये TikTok सह अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आहे. यात गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘पबजी’चा देखील समावेश होता. देशात आता पबजी पुन्हा सुरू झाले आहे. मात्र अद्यापही अनेक अॅपवरील बंदी कायम आहे. त्यातीलच एक म्हणजे TikTok. दरम्यान भारतातील बाजारात परत येण्यासाठी TikTok ची मूळ कंपनी ByteDance भारतात भागीदार शोधात आहे. भारतीय भागीदारांच्या माध्यमातून टिकटॉक परत येण्याचा मार्ग काढत आहे. 
रिपोर्टनुसार ByteDance भारतात परतण्यासाठी हिरानंदानी ग्रुपसोबत चर्चा करत आहे. हिरानंदानी ग्रुप डेटा सेंटरच्या व्यवसायात असून Yott इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन नावाने कार्यरत आहे.

कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार  ByteDance ने भारतात परतण्यासंदर्भात सरकारशी संपर्क साधलेला नाही. TikTok ला भारतात परत यायचे असेल तर सरकारच्या नियमांचे पालन करावे लागेल. तसेच डेटा सेंटर भारतातच ठेवावे लागेल. दरम्यान TiKTok वर बंदी घातल्यानंतर फेसबुकच्या मालकीच्या इंस्टाग्राम रील फीचरने TikTok ची जागा घेतली आहे. इंस्टा रिल्स सध्या खूपच प्रसिद्ध झाले आहे. तसेच इतर अॅप देखील आहेत, ज्यांनी TiKTok प्रमाणेच युझर्संना आपल्याकडे आकर्षित केले आहे. यात Chingari, MX Taka Tak आदींचा समावेश आहे. मात्र TikTok पुन्हा परत आले तर त्याची स्पर्धा इंस्टाग्राम रिल्ससोबत असेल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी